संत तुकाराम बीज निमित्य तुकाराम महाराजांना कार्यक्रमासह अभिवादन
संत तुकाराम महाराज बीज कार्यक्रमांतर्गत साई पालखी पदयात्रेते भव्य स्वागत व प्रस्थान.
कन्हान : - जगतगुरू संत तुकाराम महाराज मंदीर समिती कन्हान व्दारे संत तुकाराम महाराज मंदीर संत तुकाराम महाराज नगर कन्हान येथे पुजा , अर्चना , भजन व दहीकाला आणि कन्हान ते शिर्डी साईराम पालखी पदयात्रेचे भव्य स्वागत करून संत तुकाराम महाराज बीज कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला .
गुरूवार (दि.५) मार्च रोजी जगतगुरू संत तुकाराम महाराज मंदीर समिती व्दारे संत तुकाराम महाराज मंदीर संत तुकाराम मंदीर , संत तुकाराम महाराज नगर कन्हान येथे सकाळी १० वाजता पुजा अर्चना करून ताराचंद निंबाळकर व विठ्ठल मानकर यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . संत तुकाराम बीज कार्यक्रमाची श्री संत गजानन महाराज भजन मंडळ कन्हान चे भगवान लांजेवार , रमेश गणोरकर , गजानन वडे , हरिनाथ लेन्डे , देवराव गोतमारे , श्रावण लांजेवार , पुरूषोत्तम कुंभलकर , हीरालाल लुहुरे , गुलाबराव ढोबळे यांच्या भजन गायनाने सुरूवात करण्यात आली .
दुपारी १२.३० वाजता नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे , वसंतराव इंगोले , गुंडेराव ठाकरे , अरविंद कडुकर यांच्या हस्ते पुजन व दहीहंडी फोडुन आरती करून सर्व उपस्थितांना दहीकाल्याचा प्रसाद वितरण करण्यात आला . यावेळी कन्हान ते शिर्डी पालखी पदयात्रेचे आगमण होताच सर्व भाविक मंडळीने साईराम पालखीचे भव्य स्वागत करित पालखी पदयात्रेच्या दर्शनाचा लाभ घेत यात्रे करूना दहीकाला , बुंदीचा प्रसाद वाटप केला . मराठा सेवा संघ कन्हान व्दारे साई पालखी पदयात्रा प्रमुख मनोज चिकटे , अविनाश रायपुरे याना रूपयाचे पॉकिट देऊन यात्रेस आर्थिक मदत करण्यात आली . "संत तुकाराम महाराज की जय", साईराम की जय च्या जयघोषात साई पालखी पदयात्रा तारसा रोडने जल्लोषात पुढे मार्गक्रमण करण्यात आली . सर्व उपस्थितांनी संत तुकाराम महाराजांना तिवार वंदन करून संत तुकाराम बीज कार्यक्रम साजरा करण्यात आला .
Greetings to Tukaram Maharaj with a program on the occasion of Sant Tukaram Beej
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता ताराचंद निंबाळकर , विठ्ठल मानकर , मोतीराम रहाटे , प्रशांत भोयर , शांताराम जळते , स्वप्निल मते , योगराज अवसरे , सुधिर घोडकी , नितीन ईखार , भगवान कडु , नामदेव नवघरे , राकेश घोडमारे , एकनाथ खर्चे , नगरसेवक प्रशांत पाटील , गोविंद जुनघरे , शरद वाटकर , अशोक ठाकरे , सुरेश चकोले , मनोहर लुहुरे , मारोती ठवकर , रंजनी निंबाळकर , सुनिता मानकर , सुनंदा कोठे , दीपाली घोडकी , चंदा लुहुरे , माला नवघरे , प्रमिला मते , पुष्पा खर्चे , सुषमा चोपकर , रामेश्वरी पटले , मिना मनगटे , लता मेहर , रेवतकर ताई , शकुंतला डोणारकर , निशा फरसोले , गडे बाई , ठवकर बाई , गीता नेवारे , कुंदा चौबे , चन्ने बाई , शशिकला सोनबावणे , अनिता पटले , सुनंदा कडुकर सह सर्व संत तुकाराम नगर आणि कन्हान शहरवासी यांनी सहकार्य केले .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या