थकीत घरकरावर २ टक्के प्रतिमहिना व्याजा विरोधात नागरिकांचे निवेदन
कन्हान : - कांद्री नगर पंचायत प्रशासनाने थकीत घरकर व इतर करांवर २ टक्के प्रतिमहिना व्याज आकारण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे . या निर्णया विरोधात स्थानिक नागरिकांच्या वतीने नगरपंचायत च्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले .
Citizens' Representation Against 2% Monthly Interest on Outstanding Property Tax
सध्याच्या आर्थिक परिस्थितीत अनेक नागरिक आर्थिक अडचणीतुन जात आहेत . अशा वेळी थकीत करांवर २ टक्के प्रतिमहिना दराने व्याज आकारणे हे सर्वसामान्य नागरिकांसाठी जाचक ठरणार आहे . त्यामुळे हा निर्णय तात्काळ कमी करावा किंवा रद्द करावा , अशी मागणी करण्यात आली आहे . तसेच नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सवलत योजना जाहीर करावी . थकीत कर भरणाऱ्यांसाठी व्याजमाफी किंवा विशेष सवलत योजना लागु करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी ही निवेदनातुन करण्यात आली .
कांद्री नगरपंचायत प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या हिताचा सकारात्मक निर्णय घ्यावा , अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली . यावेळी बलवंत पडोळे , राजु देशमुख , नगरसेवक निकेश मेश्राम , महेश झोडावणे , गणेश सरोदे , अभय जांबुतकर , धर्मराज मनगटे , इंद्रपाल सुखदेवे , पुंडलिक गिरे , मुकेश गिरे , गजानन जैसारे , सिद्धार्थ गजभिये आदी नागरिक उपस्थित होते .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या