दगडी कोळसा चोरी करुन नेणाऱ्या आरोपीला वाहनासह पकडले
आरोपी अटक, कोळसा आणि वाहन असा एकुण २,१ ०,६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त.
कन्हान : - वेकोलि सिंगोरी खुली कोळसा खदान येथुन मारूती ओमनी वाहनात दगडी कोळसा चोरुन नेणाऱ्या आरोपीला वाहनासह सिंगोरी सुरक्षा रक्षकांनी पकडले . कारवाईत कोळसा आणि वाहन असा एकुण २,१ ०,६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .
शुक्रवार (दि.३०) जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता दरम्यान वेकोलि सिंगोरी खुली कोळसा खदान प्रभारी सुरक्षा अधिकारी संजय सेलुकर (वय ५८) रा.पद्मावती नगर गोंधनी, नागपूर हे सुरक्षारक्षक रविकांत रामदास कंडे आणि प्रविण श्रीराम पिम्पल शेंडे यांचे सोबत वेकोलि सिंगोरी परिसरात पेट्रोलिंग होते . दरम्यान सिंगोरी खुली कोळसा खदान मधुन कोळसा चोरी करून वाहन चालक मारोती ओमनी चारचाकी वाहन क्रमांक .एमएच ४० ए ०१०३ मध्ये कोळसा घेवुन जातांनी दिसुन आला . सुरक्षा रक्षकांनी वाहन चालकाला हात दाखवुन थांबण्याचा ईशारा केला असता , तो न थांबता वेगाने पळुन गेला , रक्षकांनी त्याचा पाटलाग करून एच.एन.आर पेट्रोल पंप जवळ नांदगाव, शेत शिवारात वाहनासह पकडले .
कन्हान पोलीसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हारगुडे , पोहवा अमित यादव , पोहवा हरिष सोनभद्रे , पोशि मोहित झाडे घटनास्थळी दाखल झाले . आरोपी आनंद अशोक मेश्राम (वय २९) वर्षे, रा. मेंहदी, ता.पारशिवनी, जि. नागपुर याला दगडी कोळसा विकत घेतल्याचे बिल व दगडी कोळसा वाहतुक करण्याचा परवाना बाबत विचारणा केली , परंतु त्याचे जवळ कोणताही परवाना मिळुन आला नाही . आरोपीने सदर दगडी कोळसा वेकोलि सिंगोरी येथिल ओव्हर बर्डन डॅम्पींग यार्ड मधुन चोरी करुन आणल्याचे सांगितले . पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन आरोपी आनंद मेश्राम ला ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन दगडी कोळसा आणि ओमनी मारुती वाहन असा एकुण २,१०,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . या प्रकरणी कन्हान पोलीसांनी वेकोलि सिंगोरी खुली कोळसा खदान प्रभारी सुरक्षा अधिकारी संजय सेलुकर यांचा तक्रारी वरून आरोपी आनंद मेश्राम विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .
दगडी कोळसा चोरी करुन नेणाऱ्या आरोपीला वाहनासह पकडले
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या