Advertisement

हर हर महादेव च्या जयघोषाने कामठेश्वर महादेव मंदिर दुमदुमले


"हर हर महादेव" च्या जयघोषाने कामठेश्वर महादेव मंदिर दुमदुमले


कन्हान : - महाशिवरात्रिच्या पावन पर्वा निमित्त कन्हान परिसरातील जुनी कामठी येथील कामठेश्वर महादेव मंदिर येथे पहाटेपासुनच भक्तांची प्रचंड गर्दी उसळली होती . "हर हर महादेव" च्या जयघोषाने संपुर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला असुन वातावरण भक्तिमय आणि उत्साहपुर्ण झाले होते .


कन्हान , कोलार आणि पेंच या तीन नदीच्या त्रिवेणी संगमावर  बसलेल्या जुनी कामठी येथील कामठेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रि महोत्सव निमित्त भोलेबाबांच्या दर्शनासाठी कामठी , कन्हान , पिपरी , कांद्री , टेकाडी सह ग्रामीण भागातुन भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले . पहाटे सकाळी ३ वाजता प्रकाश सिरीया , जयराम पारवानी यांच्या शुभहस्ते शिवलींगची दुध , दही जलाने अभिषेक करुन विविधत पुजा अर्चना करण्यात आली आणि काकड आरतीने धार्मिक कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . दिवसभर मंदिरा बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसुन आल्या . महिला , पुरुष , युवक , युवती आणि जेष्ठ नागरिकांनी शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेतले . मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी सुयोग्य नियोजन केले होते. 

भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी स्वतंत्र प्रवेश व निर्गमन मार्ग ठेवण्यात आले होते . तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती . पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला असून कोणतीही अनुचित घटना घडू नये याची दक्षता घेण्यात आली . मंदिर परिसरात स्थानिक नागरिक आणि सेवाभावी संस्थांच्या वतीने फराळ व चहाची व्यवस्था करण्यात आली होती . दूरवरून आलेल्या भाविकांनी या सुविधेचा लाभ घेतला  . संपुर्ण परिसरात भक्तीमय गीते , मंत्रोच्चार , घंटानाद , भजन कीर्तन सुरु असल्याने आध्यात्मिक वातावरणाची अनुभुती भाविकांना येत होती . महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते . रंगीबेरंगी दिव्यांनी उजळलेले मंदिर भाविकांचे विशेष आकर्षण ठरले . रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची वर्दळ दिसुन आली .

दुसऱ्या दिवशी सोमवार (दि.१६) फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता केजाजी महाराज भजन मंडळ जुनी कामठी , सकाळी १०:३० वाजता पासुन ह.भ.प श्री उमेश महाराज बहरुपी यांचे कीर्तन कार्यक्रम करण्यात आले . महाप्रसाद वितरण करुन दोन दिवसीय महोत्सवाची सांगता करण्यात आली .


जीवन रक्षक दलाने सांभाळली कन्हान नदी परिसराची व्यवस्था 

The Kamatheshwar Mahadev temple was filled with the sound of chants of Har Har Mahadev.

जुनी कामठी येथील कामठेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री मध्ये दर्शनाला मोठ्या प्रमाणात विविध ग्रामीण भागातुन भाविक मोठ्या संख्येने येतात . महाशिवरात्री यात्रेला येणाऱ्या यात्रेकरूची गैरसोय होऊन नदी पात्रात कोणतीही अनुचित घटना घडू नये . यासाठी जीवन रक्षक दल शाखा जुनी कामठी च्या वतीने नदी परिसरात काठावर उपस्थित राहून योग्य प्रकारे सुविधा उपलब्ध करून दिली . या प्रसंगी जीवन रक्षक दलाचे अध्यक्ष राजेश सहारे , सचिव भूषण इंगोले , ज्ञानेश्वर उके , पोलीस पाटील प्रदीप उके , विनोद मारबते , राजेश भोयर , उकुंदराव देवगडे , विठ्ठल उके ,भीमराव वागधरे , रुपेश बावणे , प्रदीप भोयर , बबलू ठाकरे , धोंडबा धुर्वे , महादेव वैले , राम जुनघरे आणि इतर नागरिकांनी नदी पात्राची योग्य व्यवस्था सांभाळली .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या