मतिमंद शाळेत सामाजिक उपक्रमातून शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा
कन्हान : - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव निमित्त सनातनी धार्मिक संस्था कन्हान क्षेत्र च्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत साजरी करण्यात आली . समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने राजीव कर्णबधिर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना चाॅकलेट व बिस्किटांचे वाटप करण्यात आले .
कार्यक्रमाची सुरुवात मार्गदर्शक भरत सावळे , शिक्षक कैलास आचरकटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता , राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन करण्यात आली . यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शुभम बावनकर , मार्गदर्शक भरत सावळे , वेदांत बावनकुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या
Shiva Janmashtami celebrated with enthusiasm through social activities in mentally retarded school
जीवन विचारांवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले . संस्थेच्या सदस्यांनी विद्यार्थांना चाॅकलेट , बिस्किटचे वाटप केले . विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू हा समाजकार्याचा खरा यशाचा क्षण ठरला व शाळेला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे सुत्र संचालन आणि आभार प्रदर्शन ऋषभ बावनकर यांनी केले . कार्यक्रमात शिक्षिका करिष्मा शास्त्री , शिक्षक सुदर्शन शेंडे , मार्गदर्शक भरत सावळे , संस्थापक अध्यक्ष शुभम बावनकर , हिमांशू सावरकर , निखिलेश चकोले , जीवन नांदुरकर , वेदांत बावनकुळे , ऋषभ बावनकर , प्रथमेश कोल्हे , आयुष संतापे , यश महालगाव , सिद्धार्थ पुंडे , क्रिश, हर्ष सूर्यवंशी सह आदि नागरिक उपस्थित होते .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या