Advertisement

मराठा सेवा संघ व्दारे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी


मराठा सेवा संघ व्दारे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी


कन्हान : - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती निमित्त मराठा सेवा संघ कन्हान व्दारे जगतगुरू संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देत शिवराय जयंती साजरी केली . 


गुरुवार (दि.१९) फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या दिवशी मराठा सेवा संघ कन्हान द्वारे सर्व प्रथम संत तुकाराम नगर येथील मंदीरात संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती उत्सवाची सुरूवात करण्यात आली . त्यानंतर शिवाजी नगर कन्हान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास मराठा सेवा संघ कन्हान चे मार्गदर्शक प्रभाकर महाजन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून " जय जिजाऊ !!  जय शिवराय !! , छत्रपती शिवरायांचा विजय असो च्या जयघोष करित उपस्थितांनी महाराजांना मानवंदन दिली .


या प्रसंगी मराठा सेवा संघ कन्हान चे प्रभाकर महाजन , शांताराम जळते , ताराचंद निंबाळकर , एकनाथ खर्चे , मोतीराम रहाटे , स्वप्निल मते , देवराव गोतमारे , राकेश घोडमारे , विठ्ठल मानकर ,  नामदेव नवघरे , ओमप्रकाश काकडे , मनिष वासे , दिगांबर हारगुडे सह शिव प्रेमी प्रामुख्याने उपस्थित राहुन शिवराय जयंती थाटात साजरी केली .

Maratha Seva Sangh celebrates Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti

सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या