शिवमंदिरात दोन दिवसीय कार्यक्रमाने महाशिवरात्रि महोत्सव उत्साहात
कन्हान : - कन्हान शहरातील स्वामी विवेकानंद परिसरातील शिवमंदिरात दोन दिवसीय कार्यक्रमाने महाशिवरात्रि महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला .
रविवार (दि.१५) फेब्रुवारी रोजी शिवमंदिरात शिवपींडीचे अभिषेक , हवन पुजन करण्यात आले. सकाळ पासुनच भाविकांनी मंदिरात विधिवत पूजा अर्चना केली व भजन , किर्तन करण्यात आले . दुसऱ्या दिवशी सोमवार (दि.१६) फेब्रुवारी रोजी भोले बाबा चे भजन कीर्तन करण्यात आले , बाबा बर्फानीचे दर्शन , स्क्रीनवर भोले बाबाचे लाईव्ह दर्शन आणि भव्य महाप्रसाद वितरण करण्यात आले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नागेश येळणे , राकेश भरणे , स्वप्नील मानकर , सौ.सुनिता मानकर , रोशन येलमुले , प्रविण खेकडे , राजेश कुरजेकर , प्रविण पुरे , राजाराम बडे , यश शेंदरे , गणेश भालेराव , नितेश भरणे , सोनाली येळणे , सुरज , मनस्वी भरणे यांच्या सह भाविकांनी परिश्रम घेतले .
Mahashivratri festival in full swing with two-day program at Shiv Mandir
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या