वराडा गावात महाशिवरात्रि महोत्सव थाटात
तीन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन
कन्हान : - जय भोले शिव पंचकमेटी वराडा द्वारे महाशिवरात्रि महोत्सव निमित्त शिवमंदिरात तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
रविवार (दि.१५) फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता शिवमंदिरात मारोतराव नागमोते यांच्या हस्ते शिवपींडीची दुध , दही , जलाने अभिषेक करुन शिव महापुजन करण्यात आले . शिवगौरी भजन मंडळ व हरिपाठ भजन मंडळ यांचा भजन , कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
Mahashivaratri festival in full swing in Varada village
सोमवार (दि.१६) फेब्रुवारी रोजी शारदा महिला भजन मंडळ , बाल गणेश भजन मंडळ , गुरुदेव भजन मंडळ आणि शिवगौरी मंडळ वराडा द्वारे जागृती भजन करण्यात आले . मंगळवार (दि.१७) फेब्रुवारी रोजी सकाळी शिवमंदिरातुन पालखी मिरवणुक काढण्यात आली , गाव भ्रमण करुन पालखीचे शिवमंदिरात समापन करण्यात आले , पालखीत महिला , भाविक भक्त मोठ्या संख्येत सहभागी झाले होते . त्यानंतर ह.भ.प.श्री पांडुरंगजी महाराज मुरुमकर यांचे काल्याचे कीर्तन, दहीकाला आणि भव्य महाप्रसाद वितरण करुन महोत्सवाची सांगता करण्यात आली , या महोत्सवात गावातील महिला सह भाविक भक्त मोठ्या संख्येत सहभागी झाले होते . कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शुभम नागमोते , स्वप्निल वरखडे , हर्षल नेवारे यांच्यासह महिला आणि पंच कमेटी सदस्यांनी परिश्रम घेतले .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या