सराईत गुन्हेगार विशाल चिचोंळकर नागपुर मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द
कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सराईत गुन्हेगार विशाल चिचोंळकर याला नागपुर जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांचा आदेशानुसार नागपुर मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले .
कन्हान येथील सराईत गुन्हेगार विशाल नामदेवराव चिचोंळकर (वय ३९) रा. धरम नगर कन्हान ता.पारशिवनी जि. नागपुर याचा विरूध्द कन्हान पोलीस स्टेशन येथे साथीदारासह प्राणघातक शस्त्राने जिवे मारण्याचा प्रयत्न करून दरोडा घालणे , गैरकादयाची मंडळी जमवुन खुनाचा प्रयन्त करणे , गंभीर दुखापत पोहचवुन शिवीगाळ करूण जिवे मारण्याची धमकी देणे , शासकीय मनाई आदेशाचे उल्लंघन करूण प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणे , साथीदारांसह चोरी करणे आणि अवैध गांजा जवळ बाळगुण विकी करणे अशा प्रकारेचे गुन्हे दाखल आहे . आरोपी विशाल चिंचोळकर याचा कडुन भविष्यात अशा प्रकारचा गंभीर गुन्हा दाखल होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्याचा गुन्हेगारी कृत्याला आळा घालण्यासाठी विशाल चिचोंळकर विरुध्द कन्हान पोलीस स्टेशन येथुन कलम ३ (१) एमपीडीए कायद्या अन्वये कारवाई करण्यात आली .
सदर प्रस्ताव नागपुर जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी त्यांचे आदेश कं आजिदं/गृह/कक्ष-१४ (१)/कावि- ४८/२०२६ बुधवार (दि.४) फेब्रुवारी रोजी स्थानबध्द करणे बाबत आदेश पारित केल्याने विशाल नामदेवराव चिचोंळकर याला गुरुवार (दि.५) फेब्रुवारी रोजी नागपुर मध्यवर्ती कारागृहात स्थानबंध्द करण्यात आले .
Habitual offender Vishal Chicholkar has been detained in Nagpur Central Jail.
सदर कार्यवाही नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार , अप्पर पोलीस अधिक्षक अनिल म्हस्के यांचा मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड , पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे , पोहवा हरिष सोनभद्रे , पोहवा. अमित यादव , पो.शि. आकाश सिरसाट , अश्विन गजभिये, वैजनाथ तोटेवार आदीने पार पाडली .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या