टेकाडी ते जामसावळी श्री हनुमान पालखी पदयात्रेचे प्रस्थान , भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ठिकठिकाणी भाविकांचे जल्लोषात स्वागत ; फुलांचा वर्षाव , अल्पोहार वितरण
"जय श्रीराम , जय जय श्रीराम , सियाबर रामचंद्र की जय , पवनसुत हनुमान की जय ” जयघोषाने परिसर दुमदुमूले
कन्हान : - कन्हान परिसरातील टेकाडी गावातून दरवर्षीप्रमाणे यंदाही टेकाडी ते जामसावळी श्री हनुमान पालखी पदयात्रा उत्साहात व भक्तिमय वातावरणात काढण्यात आली . गुरुवार (दि.२६) फेब्रुवारी रोजी पहाटे श्री हनुमान मंदिरात विधिवत पूजा , महाआरती व प्रसाद वितरणानंतर पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला.
श्री हनुमान मंदिर टेकाडी व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने या पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते . गावातील जेष्ठ नागरिक तसेच श्री हनुमान मंदिर कमेटीचे अध्यक्ष पंढरीजी बाळबुधे यांच्या हस्ते पूजन व महाआरती पार पडली . यानंतर परिसरात प्रसादाचे वाटप करण्यात आले . पालखीने प्रथम गावात भ्रमण करून भाविकांचे आशीर्वाद घेतले . त्यानंतर टेकाडीहून जामसावळीच्या दिशेने पदयात्रेला प्रस्थान करण्यात आले .
Departure of Shri Hanuman Palkhi Padayatra from Tekadi to Jamsawali, spontaneous response from devotees
नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर तसेच कांद्री , तारसा रोड चौक , आंबेडकर चौक मार्गे ब्रुक बॉण्ड गेट कन्हान परिसरात पदयात्रेचे भाविकांनी फुलांच्या वर्षावाने स्वागत केले . ठिकठिकाणी चहा व अल्पोहाराचे वाटप करण्यात आले . “ जय श्रीराम , जय जय श्रीराम , सियाबर रामचंद्र की जय , पवनसुत हनुमान की जय ” यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता . कामठी मार्गे ही पदयात्रा पुढे जामसावळी कडे रवाना झाली . यात्रेत महिला , युवक व जेष्ठ नागरिक अशा विविध वयोगटातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . भक्तिभाव , शिस्त आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडलेली ही पालखी पदयात्रा परिसरातील धार्मिक एकतेचे प्रतीक ठरली .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या