Advertisement

छत्रपती शिवाजी महाराजांची टिपु सुलतानाशी तुलना


छत्रपती शिवाजी महाराजांची टिपु सुलतानाशी तुलना


हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.


कन्हान : - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची टिपु सुलतान यांच्याशी तुलना केल्याच्या वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे  . काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कन्हान शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी केली आहे . या संदर्भात पक्षाचे नेते तथा कन्हान - पिपरी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष डॉ.मनोहर पाठक यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी कन्हान पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांना निवेदन सादर केले . 


निवेदनात सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवुन त्यांच्या वर तात्काळ गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करावी , अशी मागणी करण्यात आली आहे . सपकाळ यांनी एका कार्यक्रमात बोलतांना छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपु सुलतान यांची तुलना केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडुन करण्यात आला आहे . या विधानामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा करण्यात आला असुन , राज्यभरात संताप व्यक्त होत असल्याचे ही पदाधिकाऱ्यांनी नमुद केले . महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही केली जाऊ शकत नाही . अशा प्रकारचे विधान समाजात तेढ निर्माण करणारे असुन अत्यंत बेजबाबदार आहे , असे निवेदनात म्हटले आहे. पोलीसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी , अन्यथा कन्हान शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा इशाराही देण्यात आला . 

Comparison of Chhatrapati Shivaji Maharaj with Tipu Sultan

निवेदन देतांना नागपुर ग्रामीण जिल्हा महासचिव अशोक पाटील , सुनील लाडेकर , रोहित मानवटकर , कन्हान शहर अध्यक्ष रजनीश मेश्राम , संदीप कभे , हरीश खंगारे , स्वप्निल वाघधरे , राजेंद्र हटवार , मनोहर मेश्राम , मुकेश करसोलिया , माजी नगरसेविका लक्ष्मी लाडेकर , संगीता खोब्रागडे , स्वाती पाठक , शशिकला बागळे , रेखा धगट , आशा छलिया यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

Comparison-of-Chhatrapati-Shivaji-Maharaj-with-Tipu-Sultan

 दरम्यान या प्रकरणी काँग्रेसकडुन अधिकृत भूमिका समोर आलेली नसुन पुढील घडामोडीकडे लक्ष लागले आहे.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या