Advertisement

कांद्री येथे आरोग्य रोगनिदान शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


कांद्री येथे आरोग्य रोगनिदान शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


११० नागरिकांच्या आरोग्याची तपासणी , छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव निमित्त सेवाभावी उपक्रम 


कन्हान : - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव निमित्त कन्हान शहर विकास मंच आणि सुपर केअर हाॅस्पीटल,कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री हनुमान  मंदिर , खदान रोड , गांधी चौक कांद्री येथे भव्य मोफत आरोग्य रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले .



कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच चे मार्गदर्शक भरत सावळे , नारायण गजभिए , पोलीस पाटील कांचन मस्के , माजी मुख्याध्यापिका विशाखा ठमके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता , राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन मानवंदना देण्यात आली .


शिबीरात सुपर केअर हाॅस्पीटल येथील डॉ.वलीउर शाहीर रहमान , डॉ.अख्तर खान , डॉ.अदित हवेलीकर , डॉ.ऋषीकेश मालीकर यांचा मार्गदर्शनात एकुण ११० नागरिकांच्या दांत व मुख रोगांची तपासणी , जनरल सर्जन / शल्य चिकित्सक तपसणी , ० ते १२ वर्ष पर्यंतच्या बालरोगाची तपासणी , डोळे तपासणी , मोतीबिंदू आणि पडदा तपासणी करण्यात आली . यावेळी डॉक्टरांनी  "आपले आरोग्य कसे व्यवस्थित राहील" यावर उपस्थितांना आरोग्य विषयी मार्गदर्शन केले . हनुमान मंदिर,खदन रोड पंच कमेटी चे शिबीराला विशेष सहकार्य लाभले .

Citizens' spontaneous response to health check-up camp in Kandri

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , मार्गदर्शक भरत सावळे , नारायण गजभिए , वामन देशमुख , प्रमोद गिऱ्हे , निखिल तांडेकर , यश शेंडे , मृणाल सरोजकर , शुभम बावनकर , सुर्यभान चकोले , अविनाश कांबळे , निलकंठ मस्के , अर्चना तांडेकर , मीना गिऱ्हे , ममता मेश्राम , जयश्री गटपाडे , सुषमा मस्के , रंजना किरपाने , विभा पोटभरे , सुरज वरखडे , अर्जुन पात्रे , निखिल मेश्राम , अभिषेक साखरे , अभय ऊके , रुजल मेश्राम , रुपेश मेश्राम , मयुर बावणे सह आदि सदस्यांनी परिश्रम घेतले .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या