Advertisement

पारशिवनी तहसील कार्याल मध्ये संजय गांधी निराधार विभागांमध्ये अर्ज पडताळणी संपन्न


पारशिवनी तहसील कार्याल मध्ये संजय गांधी निराधार विभागांमध्ये अर्ज पडताळणी संपन्न

पारशिवनी: दिनांक ५/२/२०२५ ला पारशिवनी तहसील कार्याल संजय गांधी निराधार विभागांमध्ये संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेची मीटिंग घेण्यात आली. 

या मीटिंगमध्ये 133 श्रावणबाळा योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्ज पात्र करण्यात आले व ३ अर्ज तात्पुरते अपात्र करण्यात आले तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या 103 लाभार्थ्यांचे अर्ज पात्र करण्यात आले. व २ अर्ज तात्पुरत्या अपात्र करण्यात आले. 

एकूण 236 लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष राजु के. भोस्कर सदस्य मनोहर जी पाठक, प्रेमजी भांडेकर, रोशन जी पिंपरामुळे, अनिल जी वांडे, सुधाकर जी गजभे,समितीने मंजूर प्रदान केली. पुढील आठवड्यात मा. तहसीलदार व नायब तहसीलदार साहेब यांची स्वाक्षरी घेऊन यादी  सार्वजनिक प्रसिद्धी करण्यात येईल.


 Application verification was completed in the Sanjay Gandhi Niradhar (Destitute) Department at the Parshivani Tehsil office.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या