Advertisement

विदेशी दारुच्या वाहतुकीवर कारवाई ; दोन आरोपी पोलीसांच्या ताब्यात


विदेशी दारुच्या वाहतुकीवर कारवाई ; दोन आरोपी पोलीसांच्या ताब्यात


८ लाख ७२ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त 

स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण व कन्हान पोलीसांची संयुक्त कारवाई

कन्हान : - कन्हान पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पोलीसांनी बोर्डा शिवारात नाकाबंदी करुन अवैधरित्या विदेशी दारुच्या वाहतुकीवर कारवाई केली . कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेऊन वाहनासह एकुण 

८ लाख ७२ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .

शनिवार (दि.२१) फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता च्या दरम्यान कन्हान पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलीस कन्हान परिसरात अवैध धंद्यावर कारवाई करणे कामी परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना मनसर कडुन जबलपुर - नागपुर महामार्गाने अवैधरित्या विदेशी दारुची वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली . पोलीसांनी बोर्डा शिवारात नाकाबंदी केली असता मनसर कडुन नागपुर च्या दिशेने एक संशयित होंडा सिटी कंपनीची कार क्रमांक एम एच ४८ एस ३६९८ ही मिळुन आली . 

वाहनास थांबवुन पोलीसांनी पाहणी केली असता विदेशी दारुच्या निपा मोठ्या प्रमाणात दिसुन आल्या . आरोपी नामे १) प्रेमकुमार श्रीनाथ सिंग (वय ३४) २) प्रिंसकुमार श्रीनाथ सिंग (वय ३६) दोन्ही रा. सुंदर नगर ब्रम्हपुरी, ता.ब्रम्हपुरी, जिल्हा चंद्रपुर यांना परवाना बाबत विचारफुस केली असता त्यांनी परवाना नसल्याने सांगितले .

 पोलीसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन रॉयल स्टॅग सुपीरियर व्हिस्की कंपनीच्या ६२४ विदेशी दारूच्या निपा किंमत १,६२,२४० रूपये ,  होंडा सिटी कंपनीची कार किंमत ७,००,००० रूपये आणि रेडमी कंपनीचा अॅड्रॉईड मोबाईल किंमत १०,००० रूपये असा एकुण किंमती ८,७२, २४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . या प्रकरणी कन्हान पोलीसात आरोपी विरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .


सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ संतोष गायकवाड , पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हारगुडे , पोहवा हरिष सोनभद्रे , अमित यादव , सचिन वेळेकर , पोशि जीवन विघे , स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक बटुलाल पांडे , पोहवा प्रमोद भोयर , पोना संजय भदोरिया सह आदि पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या