Advertisement

गोवंशाची वाहतुक करणाऱ्या चारचाकी वाहनाला पकडले , नऊ गोवंशाची सुटका

गोवंशाची वाहतुक करणाऱ्या चारचाकी वाहनाला पकडले , नऊ गोवंशाची सुटका

एक आरोपी अटक , ६ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

कन्हान पोलीसांच्या डीबी पथकाची मोठी कारवाई 

कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा मार्गावर नागपुर - जबलपुर महामार्ग रोडच्या पुलाखाली पोलीसांनी नाकाबंदी करुन गोवंशाची अवैध वाहतुक करणाऱ्या चारचाकी वाहनाला पकडले . या कारवाईत वाहन चालकाला अटक करण्यात आली असुन ९ जनावरांची सुटका करत ६ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .

शुक्रवार (दि.९) जानेवारी रोजी रात्री १२ वाजता च्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ संतोष गायकवाड , पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक रोशन बावनकर , उपनिरीक्षक प्रवीण हारगुडे , हरिष सोनभद्रे , अमित यादव , जीवन विघे , सचिन तालेवार सह आदि पोलीस कर्मचारी अवैध धंद्यावर कारवाई करणे कामी परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गोवंश तस्करी होत असल्याची माहिती मिळाली .

या आधारे तारसा मार्गावर नागपुर - जबलपुर महामार्ग रोडच्या पुलाखाली पोलीस स्टाफसह नाकाबंदी करीत असतांना एक पांढऱ्या रंगाचा अशोक लेलैंड कंपनीचा बडा दोस्त चारचाकी वाहन क्रमांक एम एच २७ एक्स ८९६० कन्हान च्या दिशेने येतांनी दिसला . वाहन चालकाला थांबवण्याचा ईशारा केला असता चालकाने पोलीसांना पाहुन वाहन दुरच थांबवले व दोन्ही इसम वाहन सोडुन पळुन गेले . पोलीसांनी दोन्ही इसमाचा पाठलाग केला असता वाहन चालक मिळुन आला आणि दुसरा इसम पळुन गेला . पोलीसांनी वाहन चालक आशिफ मौसीन कुरैशी (वय ३५) रा.परवेश नगर , पीली नदी , नागपुर ला ताब्यात पंचासमक्ष वाहनाची सखोल चौकशी केली असता मागील डाल्यात ९ गोवंश  दोरखंडाने बांधुन , कोणतीही खाण्यापिण्याची व्यवस्था न करता क्रुरतेने कोंबलेली निर्दय व वेदनायक अवस्थेत आढळुन आली .

पोलीसांनी वाहन चालका कडे जनावरांच्या वाहतुकीबाबत परवाना व कागदपत्रांची चौकशी केली असता त्याच्याकडे कोणतेही वैध दस्तऐवज नसल्याचे निष्पन्न झाले. जनावरांची कत्तलीसाठी धोकादायक पद्धतीने वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाल्याने चालकास अटक करून वाहनासह ६ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि सुटका करण्यात आलेल्या जनावरांना सुरक्षिततेसाठी गो विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार येथे दाखल करण्यात आले. या प्रकरणी सरकार तर्फे फिर्यादी सहायक पोलीस निरीक्षक रोशन बावनकर यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीस ठाण्यात आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड , पोलिस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .

सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या