गटनेते पदी अतुल हजारे , उपनेते पदी शिवशंकर चकोले यांची बहुमताने निवड
कन्हान : - कांद्री नगर पंचायत येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक – नगरसेविकांच्या बहुमताने गुरुवार (दि. ८) जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय , नागपूर येथे ‘कांद्री (कन्हान) नगरविकास आघाडी’ या नव्या राजकीय गटाची अधिकृत स्थापना करण्यात आली असुन जिल्हाधिकारी मा. विपिनजी इटनकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये ही गटस्थापना पार पडली .
यावेळी बहुमताने अतुल रमेशजी हजारे यांची नवगठित आघाडीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली असुन शिवशंकरजी (शिवा) रामभाऊजी चकोले यांची उपनेतेपदी , तर बंटी सरोदे यांची पक्ष प्रतोदपदी निवड करण्यात आली .
या प्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुजितजी डोमाजी पानतावणे यांच्यासह नगरसेवक चंद्रपालज कश्यप , उमेश वाडीभस्मे , सितारामजी नाटकर , राकेश लांजेवार उपस्थित होते . तसेच नगरसेविका सौ.मिनाक्षी भुते , सौ.सविता राऊत , सौ.माधुरी मस्के , सौ.आरती कोतपल्लीवार , सौ.रिता मस्के , सौ.संघमित्रा डोंगरे , सौ.रोशनी गजभिये यांनी बहुमताने सहभाग नोंदविला . यावेळी नरहरी पोटभरे , रवींद्र कोतपल्लीवार , अतुल गजभिये प्रामुख्याने उपस्थित होते .
कांद्री नगरपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी एकसंघपणे काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला . मूलभूत सुविधा , पाणीपुरवठा , स्वच्छता , रस्ते , आरोग्य व नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक आणि गतिमान कारभार करण्याचा संकल्प नवगठित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला .
या गटस्थापनेमुळे कांद्री नगरपंचायतीच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले असून येत्या काळात विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या