There is a demand to immediately resolve the various pressing issues in ward number 8.
प्रभाग क्रमांक ८ मधील विविध ज्वलंत समस्या तातडीने सोडवण्याची मागणी
नगरसेविका लताताई लुंढुरे यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
कन्हान : - कन्हान - पिपरी नगर परिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक ८ मधील विविध ज्वलंत समस्या
तातडीने सोडवण्याची मागणी नगरसेविका लताताई लुंढुरे यांनी मुख्याधिकारी दिपक घोडके यांना निवेदन देऊन केली आहे .
There is a demand to immediately resolve the various pressing issues in ward number 8.
निवेदनात सांगितले कि , स्वामी विवेकानंद नगर व शिवाजी नगर येथील सार्वजनिक नालीवर झाकण नसुन नाल्या उघड्या आहेत . रस्त्याचे बांधकाम व पेव्हरब्लॉक बसवुन उघड्या नालीवर झाकण बसविण्यात यावे . तसेच मोकाट डुकरांचा , कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावे , असे निवेदनात नमुद केले आहे . या गंभीर समस्या लक्षात घेत नगरसेविका लताताई लुंढुरे यांनी मुख्याधिकारी दिपक घोडके यांची भेट घेतली आणि निवेदन देऊन तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे . या प्रसंगी कन्हान - पिपरी नगर परिषद विरोधी पक्ष गटनेते हरिश तिडके , प्रदीप गायकवाड , अभिजीत चांदुरकर , सरिताताई कुर्वे प्रामुख्याने उपस्थित होते .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या