हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे बाल आनंद मेळावा उत्साहात
कन्हान : - विद्यार्थ्यांना बालवयातच व्यवहारीक ज्ञान मिळावे व गणिती कौशल्ये विकसित व्हावे या उद्देशाने श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे "बाल आनंद मेळाव्याचे आयोजन सोमवार (दि.१९) जानेवारी रोजी करण्यात आले .संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र वाघमारे साहेब आणि माजी मुख्याध्यापिक कु वंदना रामापुरे यांच्या शुभहस्ते माता सरस्वती यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले . तसेच कार्यक्रमाला कार्यवाहक मुख्याध्यापक हेमंत वंजारी सर यांनी कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे मा.श्री.प्रशांतजी मसार सर यांचे स्वागत केले .
संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना "बाल आनंद मेळावा"विषयी मार्गदर्शन केले . उद्घाटना नंतर मान्यवरांनी व विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांची खरेदी करून मनसोक्त आनंद लुटला . मान्यवरांनी व शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी प्रत्येक स्टॉल वर जाऊन विद्यार्थांनी तयार केलेले पदार्थांची चवचाखली व विद्यार्थ्यांना खरेदी विक्री कशी करावी व व्यवहारातील पारदर्शकता कशी राखावी यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन केले .यामध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद दिला व आपले पदार्थ योग्य रीतीने खरेदी विक्री केले .
या कार्यक्रमा मध्ये पर्यवेक्षकाची भूमिका ज्येष्ठ शिक्षिका पवार मॅडम आणि भास्कर सातपुते सर यांनी साकारली .कार्यक्रमाचे संचालन कु.नेहा गायधने मॅडम यांनी केले आणि आभार प्रदर्शन पवनकुमार ठमके सर यांनी केले . या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कीर्ती वैरागडे ,योगिता चांदेवार , गीता वंजारी , रानु बिस्ट , सुवर्णा रामापूरे , अभिषेक मोहनकर , रूपेंद्र सेंगर व माजी विद्यार्थी आणि पालक वर्गांनी विशेष परिश्रम घेतले व सदर कार्यक्रम यशस्वी करून दाखविला .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या