Advertisement

केडीके काॅन्व्हेंट शाळा टेकाडी येथे ७७ वा प्रजासत्ताक दिवस साजरा


केडीके काॅन्व्हेंट शाळा टेकाडी येथे ७७ वा प्रजासत्ताक दिवस साजरा


कन्हान : - टेकाडी येथील केडीके काॅन्व्हेंट शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि.प सदस्य व्यंकटेश कारेमोरे , प्रमुख पाहुणे मनिषा येवले , शाळेचे संचालक अविनाश कांबळे , पोलीस पाटील पुंडलिक कुरडकर , सुरेशराव मोहाडे , भोजराज उमक , वसंतराव कांबळे , प्रमोद मलेवार , किशोर वासाडे यांचे हस्ते भारत माता , राष्ट्रपिता महात्मा गांधी , विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , स्व. केशवराव देवाजी कांबळे  यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात केली . मान्यवरांचा हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रगिताने राष्ट्रध्वज तिरंग्याला सलामी देऊन महापुरूषांना अभिवादन करण्यात आले . यावेळी मान्यवरांनी विद्यार्थांना, पालकांना आणि उपस्थितांना मार्गदर्शन करुन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या .

केडीके काॅन्व्हेंट शाळा टेकाडी येथे ७७ वा प्रजासत्ताक दिवस साजरा

या प्रसंगी मुख्याध्यापिका निशा देशमुख , शिक्षिका मनिषा कांबळे , अर्चना कारेमोरे , अर्पना गजभिये , रीना राम , सदानन वासाडे , अंकुश कांबळे , विशाधर कांबळे ,  रंगराव लेकुरवाडे आदी सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

The 77th Republic Day was celebrated at KDK Convent School, Tekadi.

सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या