धर्मराज शैक्षणिक परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
कन्हान : - भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त धर्मराज शैक्षणिक परिसरात इंदिरा एज्युकेशन सोसायटी पिवळी नदी नागपुर सचिव खुशालराव पाहुणे यांचे अध्यक्षतेत आणि कांद्री नगराध्यक्ष मा. सुजित पानतावणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी प्रमुख अतिथी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हारगुडे , उपाध्यक्ष धर्मेंद्र सरोदे , नगरसेविका योगीता भलावी , सुनंदा दिवटे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विधिलाल डहारे , महादेव किरपान , सुनिल लाडेकर , गोविंदराव किरपान , हरिष केवटे , कु.कल्याणी सरोदे , मुख्याध्यापक (माध्य) प्रकाश डुकरे , मुख्याध्यापक (प्राथ) खिमेश बढिये , उपमुख्याध्यापक मोहन भेलकर , पर्यवेक्षक राजुसिंग राठोड आदी उपस्थित होते .
Republic Day was celebrated with enthusiasm at the Dharmaraj educational complex.
यावेळी विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हारगुडे यांचे हस्ते करण्यात आले . उपस्थित मान्यवरांनी उपस्थितांना समयोचित मार्गदर्शन करुन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या . धर्मराज प्राथमिक शाळेत प्राथमिक शाळेत वर्षभर राबविण्याऱ्या उपक्रमांतर्गत "अभिनंदन विद्या र्थी... I am a shining star" या उपक्रमाच्या यश स्वितेसाठी भिमराव शिंदेमेश्राम सर यांना तर "आजची उपस्थिती १०० टक्के... अभिनंदन वर्ग" या उपक्रमा च्या यशस्वितेसाठी गणेश खोब्रागडे सर यांना पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले . यावेळी शाळा स्तरावरील विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले . कार्यक्रमाचे संचालन मोहन भेलकर यांनी तर उपस्थितांचे आभार विलास डाखोळे यांनी मानले .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या