Advertisement

एमजी नगर परिसरात जुगार अड्ड्यावर धाड : चौघांना अटक


एमजी नगर परिसरात जुगार अड्ड्यावर धाड ; चौघांना अटक


दोन मोबाईल , रोख रकमेसह २०,०६० रुपयांचा मुद्देमाल जप्त


कन्हान : - कन्हान शहरातील एमजी नगर परिसरात सुरू असलेल्या हार-जीतच्या जुगार अड्ड्यावर कन्हान पोलीसांनी धाड टाकून चौघांना अटक केली. कारवाईत दोन मोबाईल व रोख रकमेसह एकूण २०,०६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


गुरुवार (दि. १५) जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात पोलीस अधिकारी  व कर्मचारी अवैध धद्यांवर कारवाई करणे कामी परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना एमजी नगर परिसरात ५२ ताशपत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली . 


पोलीस निरीक्षकांना माहिती देऊन पोलीसांनी सापळा रचुन जुगार अड्ड्यावर धाड टाकली .

कारवाईत १) सिद्धार्थ मोरेश्वर गायकवाड (वय २३ वर्ष) , २) आशिक ज्ञानेश्वर गायकवाड (वय १८ वर्ष) , ३) विकास अनिल गायकवाड (वय १९ वर्ष) , ४) शुभम मोरेश्वर गायकवाड (वय २० वर्ष) सर्व रा.तारसा रोड , कुसाजी नगर कन्हान यांना अटक करण्यात आली . पोलीसांनी अंगझडती दरम्यान दोन मोबाईल , रोख रक्कम आणि ईतर साहित्य असा एकूण २०,०६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला .


या प्रकरणी कन्हान पोलीसांनी चार आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहेत .


सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड , पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनात , उपनिरीक्षक प्रवीण हारगुडे , पोहवा हरिष सोनभद्रे , पोना आतिश मानवटकर , पोशि आकाश सिरसाट , राहुल जाधव , अश्विन गजभिए , अनिल यादव , सम्राट वनप्रती सह आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या