अखिल भारतीय ग्राहक पंचायत पारशिवनी शाखेतर्फे नवनिर्वाचित नगरपंचायत पारशिवनीच्या अध्यक्षा मा.सौ.सुनिताताई डोमकी यांचे निवासस्थानी शुभेच्छा
अखिल भारतीय ग्राहक पंचायत पारशिवनी शाखेतर्फे नवनिर्वाचित नगपंचायत पारशिवनीच्या अध्यक्षा मा.सौ.सुनिताताई डोमकी यांचे निवासस्थानी शुभेच्छा-स्वागत.
पारशिवनी : नगरपंचायत पारशिवनीच्या नगराध्यक्ष म्हणून मा.सौ.सुनिताताई प्रकाशजी डोमकी ह्या नुकत्याच प्रचंड मताधिक्यांनी निवडून आल्या.कुटुंबात व समाजात त्या होतकरू महिला म्हणून ओळखल्या जात होत्याच ; परंतु आता मात्र त्या पारशिवनीच्या प्रथम नागरिक झाल्या. त्यांच्या निवासस्थानी नववर्षाचे औचित्य साधून त्यांना विजयी झाल्याच्या व नववर्षाच्या शुभेच्छा नुकत्याच अखिल भारतीय ग्राहक पंचायत पारशिवनी शाखेच्या पदाधिकारी शिष्टमंडळांनी पुष्पगुच्छ देऊन दिल्या.
त्यांनी स्वतः चहापाणी देऊन गृहिणीपणा जपला हे विशेष!त्या अत्यंत शांतपणे बोलल्या की,माझ्या यजमानांनी मला ग्राहक पंचायतचे कार्य हे पारशिवनीत उत्तम सुरू आहे याबद्दल सांगितले होते परंतु माझ्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांच्या भेटीने माझा आनंद द्वीगुणित झाला.जनतेच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यास प्राधान्य राहील असे त्यांनी सांगितले.
यावेळी अ.भा.ग्राहक पंचायत शाखेचे तालुका अध्यक्ष विठ्ठलराव गांजरे, वरिष्ठ उपाध्यक्ष रघुनाथ पुंडे,उपाध्यक्ष वामनसिंग बागडी, सहसचिव ज्ञानेश्वर हुलके, संघटनमंत्री ईश्वरजी बरबटे,कार्याध्यक्ष श्याम खंडाळकर,तालुका प्रमुख नरेश उराडे,प्रसार प्रमुख सतिश साकोरे, सदस्य नानाजी मेंघरे आदि सदस्य हजर होते.शेवटी डोमकी दांपत्यांचे आभार नरेश उराडे यांनी मानले.
The All India Consumer Panchayat, Parsivani branch, extended their best wishes to the newly elected President of the Parsivani Nagar Panchayat, Hon. Mrs. Sunita Domki, at her residence.


0 टिप्पण्या