वाघाच्या हल्यात मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबांना गोवारी समाज नेते कैलाश राऊत यांची सांत्वना भेट
रामटेक : - रामटेक तालुक्यातील आदिवासी बहुल देवालापार क्षेत्रातील पिपरिया येथे बुधवार (दि.७) जानेवारी रोजी संगीता गोपीचंद वगारे शेतात काम करीत असतांना नरभक्षी वाघाच्या हल्यात दुर्दैवी मृत्यू झाला .
पीडित परिवार रोज मजुरी करणारा असून परिवारात गोपीचंद वगारे सह त्यांना तीन मुली आहेत . ही घटना अत्यंत दुःखद असून धक्कादायक आहे . घटनेनंतर परिसरात वाघाची दहशत कायम असून शेतकऱ्यात भीतीचे वातावरण आहे .पीडित परिवाराचे आदिवासी गोवारी समाज नेते व गोवारी समाज अंमलबजावणी व संनियंत्रण समिती , महाराष्ट राज्य (राज्यमंत्री दर्जा) चे अध्यक्ष कैलाश राऊत यांनी भेट देऊन सांत्वन केले .पीडित परिवाराला दुःखद प्रसंगी शासनाकडून आर्थिक मदत मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले .या प्रसंगी आदिवासी गोंड गोवारी सेवा मंडळाचे उपाध्यक्ष अविनाश सोनवाने , नंदकिशोर कोहळे , जीवन राऊत , जयदेव राऊत , बलधारी नेवारे , रवींद्र कोहळे , सुखदेव शेंद्रे , राजू बाबा कवरे , उमेश राऊत , सुनील नेवारे , ब्रम्हांद नेवारे सह समाज बांधव उपस्थित होते .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या