Advertisement

टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोलू इलेवन अमरावती विजयी


टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोलू इलेवन अमरावती विजयी


कन्हान : - कन्हान परिसरातील टेकाडी येथील डब्ल्यूसीएल मैदानावर सिंह वाहिनी ट्रान्सपोर्टच्या वतीने आयोजित रुद्रा सन्सुई सीझन वन भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोलू इलेवन अमरावती संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकाविले .


स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी (दि.१) शरदकुमार दीक्षित व बंटी आकरे यांच्या हस्ते झाले . ही स्पर्धा १ ते १४ जानेवारी या कालावधीत पार पडली . १ ते १० जानेवारी दरम्यान लीग सामने खेळविण्यात आले , तर बुधवार (दि.१४) उपांत्य व अंतिम सामने पार पडले . अंतिम सामन्यात गोलू इलेवन अमरावती व फ्रेंड्स इलेवन संघ आमनेसामने आले . अत्यंत चुरशीच्या लढतीत गोलू इलेवन अमरावती संघाने प्रभावी कामगिरी करत अंतिम सामना जिंकून विजेतेपदावर शिक्का मोर्तब केले . 

Golu Eleven Amravati emerged victorious in the tennis ball cricket tournament.

विजेत्या गोलू इलेवन अमरावती संघाला रुद्रा ट्रान्सपोर्टचे मालक बंटी आकरे यांच्या हस्ते १ लाख ५१ हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आले . उपविजेत्या फ्रेंड्स इलेवन संघाला सिंह वाहिनी ट्रान्सपोर्टचे मालक प्रीतम सिंह यांच्या हस्ते ७५ हजार रुपयांचा द्वितीय पुरस्कार देण्यात आले . डब्ल्यूसीएलचे जीएम शरदकुमार दीक्षित यांच्या हस्ते दोन्ही संघांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले . बक्षीस वितरण सोहळ्यावेळी सुरेंद्र सिंह , साबीर सिद्दिकी , चंदू सिंह , हिरालाल गुप्ता , जी. पी. वर्मा , बीरेंद्र सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती .


स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रीतम सिंह , पंकज (गोलू) सिंह , गजराज देविया , सतीश गुप्ता , भोला सिंह , बाका कुशवाह , अनुज कांबळे , रोहित डेंगे , रोहित डोंगरे , उपेंद्र सिंह , साहबाज , प्रियांशु नन्हे आदींनी परिश्रम घेतले .

सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या