Advertisement

जनता मेडिकल स्टोअर्स द्वारे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर


जनता मेडिकल स्टोअर्स द्वारे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर


कन्हान : - कन्हान शहरातील गणेश नगर मधील जनता मेडिकल स्टोअर्स च्या वतीने बुधवार (दि.७) जानेवारी रोजी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले . परिसरातील नागरिकांना सुलभ व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले .


शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून सौ.रुशाबी विलास निकम , सौ.गायत्री श्याम पिपलवा , के.डी.बनकर , जोगन पानतावने , सदस्य आंचल सिंग व कुशल डायरे उपस्थित होते .


या शिबिरात महिलांच्या आरोग्याशी संबंधित आजारांवर विशेष भर देण्यात आला . अनियमित मासिक पाळी , कमी अथवा अधिक रक्तस्राव , पेल्विक वेदना , असामान्य योनीस्त्राव , गर्भधारणा , रजोनिवृत्ती (मेनोपॉज) संदर्भातील तक्रारींवर तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले . तसेच त्वचारोग , केस गळणे, अ‍ॅलर्जी , मधुमेह , उच्च रक्तदाब व इतर सामान्य आजारांचीही तपासणी करण्यात आली .


शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.कविशा जादवानी ,  डॉ.तेजस्वी लाडी यांनी वैद्यकीय सेवा दिली . या मोफत आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घेतला . शिबिरा अंतर्गत ३२ रुग्णांची बीएमडी (हाडांची घनता) तपासणी , २४ रुग्णांची रक्तातील साखर व रक्तदाब तपासणी , १७ रुग्णांची यूरिक अ‍ॅसिड तपासणी मोफत करण्यात आली . त्यामुळे नागरिकांना वेळेत आपल्या आरोग्याची माहिती मिळण्यास मदत झाली . 


या प्रसंगी आयोजकांनी अशा प्रकारची सामाजिक आरोग्य शिबिरे भविष्यातही सातत्याने आयोजित करण्यात येतील असे सांगितले . शिबिर यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या डॉक्टर , कर्मचारी व नागरिकांचे आयोजकांनी आभार मानले .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या