Advertisement

नायलाॅन मांजानी पतंग उडविणे, तरुणाला पडले महागात


नायलाॅन मांजानी पतंग उडविणे, तरुणाला पडले महागात


पिपरीत पोलीसांची कारवाई , २५ हजारांचा दंड , चक्री जप्त 


कन्हान : - मकर संक्रांतीच्या दिवशी नायलॉन मांजाने पतंग उडविणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले . कन्हान–पिपरी परिसरातील रामनगर येथील गाडेघाट रोडवर कन्हान पोलीसांनी कारवाई करत प्लास्टिक चक्रीसह ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून २५ हजार रुपयांचा दंड भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.


बुधवार (दि.१४) जानेवारी रोजी नायलॉन मांजाविरोधात विशेष कारवाईसाठी कन्हान पोलीस कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पिपरी येथील रामनगर भागात गाडेघाट रोडवर एका तरुणाकडून हिरव्या रंगाच्या नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविला जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली . पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता अक्षय जयराम कोरवते (वय ३०, रा. रामनगर, पिपरी, कन्हान) हा नायलॉन मांजानी पतंग उडवितांना आढळून आला. पंचासमक्ष तपासणी करून आरोपीकडून प्लास्टिक चक्री (किंमत ५०० रुपये) जप्त करण्यात आली .


या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मा.उच्च न्यायालयाच्या १२ जानेवारीच्या आदेशानुसार पोलीसांनी २५,००० रुपयांचा दंड भरण्याबाबत नोटीस बजावली आहे . नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांचा धोका लक्षात घेता अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या