Advertisement

कन्हान मध्ये उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली


कन्हान मध्ये उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली


कन्हान : - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री , अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) गटाचे नेते अजितदादा पवार यांचा बुधवार (दि.२८) जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला .अजितदादा पवार विमानाने मुंबईहून बारामती कडे निघाले होते . बारामतीजवळ विमान येताच त्यांचा विमानाचा अपघात झाला . या अपघातात अजितदादा पवार यांचा सह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला . या घटनेनंतर संपुर्ण देशात आणि महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे .

Deputy Chief Minister Ajit Pawar was paid tribute by all parties in Kanhan.

बुधवार (दि.२८) अजीतदादा पवार यांचा निधनानंतर त्यांचा स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बुधवार सायंकाळी ४ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कन्हान शहर च्या वतीने आंबेडकर चौक येथे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे यांचा अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय शोकसभा पार पडली . शोकसभेत राजकीय आणि सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांचा प्रतिमेला पुष्पहार , पुष्पचक्र अर्पण केले . यावेळी


कन्हान - पिपरी नगरपरिषद नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे , विनायक वाघधरे , वर्धराज पिल्ले , किशोर बेलसरे , गणेश पानतावने , शांताराम जळते , अशोक पाटील , कैप्टन सतीश बेलसरे , राजाभाऊ राऊत यांनी अजीत पवार यांचा जीवन कार्यावर प्रकाश टाकुन मनोगत व्यक्त केले . दोन मिनटाचा मौन पाळुन अजितदादा पवार यांना श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुनील लाडेकर यांनी केले.

Deputy Chief Minister Ajit Pawar was paid tribute by all parties in Kanhan


या प्रसंगी डॉ.मोहर पाठक , अशोक चव्हाण , सुनिल लाडेकर , राजेश यादव , गौतम नितनवरे , ऋषभ बावनकर , शुभम बावनकर , शुभांगी घोगले , सुत्तम  मस्के , श्याम पीपलवा , राजेंद्र हटवार , स्वप्निल वाघधरे , आकाश वाढनकर , रवी महाकाळकर , हरीश खांगारे , संदीप कभे , रोहित मानवटकर , मनोहर मेश्राम , सम्राट पगारे , पुष्पा कावडकर , अभिजीत चांदुरकर , नारायण गजभिये , महेंद्र चव्हाण , पुरंदास  तांडेकर , श्रीराम नांदुरकर , शरद वाटकर ,  संजय शेंद्रे , महेंद्र साबरे , भूषण निंबाळकर ,आशिष दिवटे , शैलेश शेळके ,शैलेश दिवे , रंगलाल येलेकर ,प्रशांत पाटील , मयूर माटे , शशिकला बागडे , कुसुम सत्यकार , स्वाती पाठक , संगीता खोब्रागडे , लक्ष्मी लाडेकर , वर्षा लोंढे , मनीषा चिखले , सुचित्रा माटे ,पुनम राठी , योगिता भलावी , गजू गोरले , संजय शेंद्रे सह मोठ्या संख्येत सर्व पक्षाचे पदाधिकारी ,  गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या