24 जानेवारी रोजी मकर संक्रांतीनिमित्त तेली समाजाचा भव्य सामाजिक कार्यक्रम
कन्हान : - मकर संक्रांतीच्या शुभ पर्वावर श्री संताजी अखिल तेली समाज संघटना , महाराष्ट्र राज्य - कन्हान शहर यांच्या वतीने शनिवार (दि.२४) जानेवारी रोजी दुपारी १ वाजता संताजी सभागृह , कांद्री - कन्हान येथे भव्य सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . या कार्यक्रमात पदाधिकारी मेळावा , महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ तसेच समाजाच्या नव-निर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा सन्मान सोहळा होणार आहे .
तेली समाज विविध पोटजाती मध्ये विखुरलेला असल्याने समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून संघटित करण्याच्या उद्देशाने श्री संताजी अखिल तेली समाज संघटनेची स्थापना करण्यात आली आहे .समाजावर अन्याय झाल्यास संघटीत पणे आवाज उठवणे , तसेच समाजाचे सामाजिक , शैक्षणिक , आर्थिक व सांस्कृतिक अस्तित्व अधिक बळकट करणे हे संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे , अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली .
संविधानिक व्यवस्थेत समाजाला संख्येनुसार योग्य प्रतिनिधित्व मिळावे , यासाठी समाजात जनजागृती करण्यावर संघटनेचा भर आहे . संघटीत समाजाचा दबावगट निर्माण करून शासन व प्रशासनाकडून न्याय मिळवून देण्यासाठी संघटना सातत्याने कार्यरत आहे . समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण , स्पर्धा परीक्षा तसेच शासकीय व परदेशी शिष्यवृत्तीबाबत मार्गदर्शन केले जाते . गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत , तसेच समाजबांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे कार्यही संघटने मार्फत सुरू आहे .
A grand social program of the Teli community on January 24th on the occasion of Makar Sankranti.
संघटनेच्या कार्यामुळे राज्यभरात गावागावात संघटनेचा विस्तार होत असून , पुरोगामी संत व महापुरुषांच्या विचारांवर आधारीत समाज घडविण्याचे कार्य निस्वार्थ भावनेने केले जात आहे . स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाजाचे प्रतिनिधित्व वाढावे , यासाठी संघटना सातत्याने जागृती करीत आहे . नेतृत्व कोणत्याही राजकीय पक्षाचे गुलाम नसावे , ही संघटनेची ठाम भूमिका असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या