Advertisement

धानाचे बोरे चोरी करणाऱ्या ४ आरोपीच्या टोळीला अटक


धानाचे बोरे चोरी करणाऱ्या ४ आरोपीच्या टोळीला अटक


धानाचे बोरे आणि चारचाकी पिकअप वाहनासह ७ लाख ०३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त 


स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पथकाची कारवाई 


कन्हान : - स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पथकाने धानाचे बोरे चोरी करणाऱ्या ४ आरोपीच्या टोळीला अटक करुन गुन्हा उघडीस आणला . कारवाईत धानाचे बोरे आणि चारचाकी पिकअप वाहनासह ७ लाख ०३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पुढील कारवाई करण्याकरिता कन्हान पोलीसांना देण्यात आले .


तक्रारदार राजेश आनंदराव चरडे (वय ४५) रा.निलज यांचा शेतात धानाची लागवड केली . त्यांचा शेतातुन ६७ बोऱ्या धान निघाला . रविवार (दि.४) जानेवारी रोजी बोऱ्या शिलाई मारुन शेतात ठेवले . बुधवार (दि.७) जानेवारी रोजी सकाळी शेतात जाऊन पाहणी केली असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचा शेतात ठेवलेले ६७ धानाचे बोरे पैकी १६ धानाचे बोरी चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी राजेश चरडे यांचा तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता .


नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार , अप्पर पोलीस अधिक्षक अनिल मस्के , स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचा मार्गदर्शनात सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पथक यांनी सुरु केला . गुप्त बातमीदाराच्या आणि तांत्रिक पुराव्याचा आधारे गुन्हा उघडकीस आणला . तपास दरम्यान गुन्ह्यात महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक एम एच ४० बी एल ६५५३ चा वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले . पथकाने गुन्ह्याचा सखोल तपास करुन आरोपी देवानंद गणपत तिरबुढे (वय ३२) वर्षे , रोहित रमेश तिरबुढे (वय २२) वर्षे , मुकेश कुसाराम बावणे (वय २८) तीनही रा. धानला व निखिल ओमप्रकाश बोंद्रे (वय २६), रा.मौदा यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत सखोल विचारपूस केली असता त्यांनी पोस्टे कन्हान , मौदा , अरोली , कामठी शहर हद्दीत गुन्हा केल्याचे कबुल केले . पथकाने आरोपींच्या ताब्यातुन धानाचे एकुन ६९ बोरे किंमत १,७२,५०० रुपए , बोलेरो पिकअप क्रमांक एम एच ४० बी एल ६५५३ किंमत ५,००,००० रुपए , तीन अॅनराॅईड मोबाईल किंमत ३०,००० रुपए , नगदी ९५० रुपए असा एकुण ७,०३,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीची मेडिकल तपासणी करून पुढील तपासकमी कन्हान पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे .


सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचा मार्गदर्शनात , सपोनि किशोर शेरकी , एएसआई विनोद काळे , पोहवा प्रमोद भोयर , पोना संजय बरोडिया , पोशी आशुतोष लांजेवार , सायबर सेलचे पोना सतीश राठोड , पोशी मृणाल राऊत यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या