वाघोली शेत शिवारात इसमाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ
पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे व फॉरेनसीन पथक घटनास्थळी दाखल
कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर - जबलपुर महामार्गावरील वाघोली शेत शिवारातील शेतात धान पिक काढलेल्या बांधित तणसा सह अनोळखी इसमाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळुन आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे .
नागपुर - जबलपुर महामार्ग लगत वाघोली शेत शिवार केरडी कडे जाणाऱ्या बस स्टाॅपच्या मध्यतरी मुजाहिर युनुस शेठ रा.कामठी यांची दहा एकर शेती केरडी माजी पोलीस पाटील देवाजी हरिभाऊ भोयर वय ६७ वर्ष रा. केरडी हे १५ वर्षा पासुन ठेक्याने करीत आहे .
दहा एकर शेतीतील धान कटाई ८ दिवसा पुर्वी करून त्यात गहु फेकुऊ पध्दतीने लावला आहे . गुरवार (दि.१) जानेवारी २०२६ ला देवाजी भोयर हे ५ वाजता कन्हान वरून केरडी गावाकडे चारचाकी वाहनाने राजु बंडु पाटील सोबत जात असतांना शेतातील तणस पेटतांनी दिसुन आला . शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता तेथे एक अनोळखी इसमाचे प्रेत जळतांनी मिळुन आले .
घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे आतिश मानवटकर , सचिन वेळेकर , आकाश खोब्रागडे व इतर स्टाप सह घटनास्थळी दाखल झाले . फॉरेनसीन पथकाला बोलावुन घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कामठी उपजिल्हा रूग्णालयात तपासणी करिता पाठविण्यात आले आहे . सदर घटना गंभीर असुन कन्हान पोलीस पुढील तपास करीत आहे .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या