कांद्रीत भाजप द्वारे सुशासन दिवस उत्साहात साजरा
कन्हान : - नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्व यांचा संगम असलेले भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने कांद्री येथे सुशासन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला .
भूमिपुत्र युवा प्रतिष्ठान कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले . या प्रसंगी कांद्री नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुजीत पानतावणे , भाजपा नागपूर जिल्हा मंत्री अतुल हजारे , शहराध्यक्ष शिवाजी चकोले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला . त्यांच्या नेतृत्वाखाली देशात रस्ते , दळणवळण , दूरसंचार यांसारख्या पायाभूत सुविधांना चालना मिळाली . स्वच्छ व पारदर्शक प्रशासन , लोक कल्याणकारी योजना आणि सर्वसमावेशक विकास हीच त्यांच्या सुशासन संकल्पनेची ओळख असल्याचे वक्त्यांनी सांगितले . यावेळी नवनिर्वाचित व नवनियुक्त नगरसेवक मीनाक्षी भुते , सविता राऊत, चंद्रपाल कश्यप , माधुरी मस्के , उमेश वाडीभस्मे , धर्मेंद्र सरोदे , सीताराम नाटकर , आरती कोतपल्लीवार , रीता मस्के , संगमित्रा डोंगरे , रोशनी गजभिये , राकेश लांजेवार , खुशाल वाहने , नरहरी पोटभरे , एकनाथ आंबाळकर , सौरभ पोटभरे , रवी कोतपल्लीवार , विजय पोटभरे , रोहित चकोले , कशिश पानतावणे आदी उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांवर चालत समाजहितासाठी व शहराच्या विकासासाठी काम करण्याचा संकल्प व्यक्त केला . सुशासन, पारदर्शकता आणि जनतेशी थेट संवाद या मूल्यांना प्राधान्य देत काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या