Advertisement

दुचाकीने अवैध रेती वाहतुक करणाऱ्या तरुणाला पकडले | Youth caught transporting sand illegally on a bike


दुचाकीने अवैध रेती वाहतुक करणाऱ्या तरुणाला पकडले

६ बोऱ्या आणि दुचाकी वाहना सह ४५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त 

कन्हान पोलीसांची कारवाई 

कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत गाडेघाट नदी घाटातुन रेती बोऱ्या मध्ये भरून विकण्याकरिता दुचाकीने वाहतुक करणाऱ्या तरुणाला कन्हान पोलीसांनी पकडुन त्याचा जवळुन ६ बोऱ्या आणि दुचाकी वाहना सह ४५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे .


बुधवार (दि.२९) आॅक्टोंबर रोजी सकाळी ९ ते १०:४० वाजता च्या दरम्यान कन्हान पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात उपनिरीक्षक सुनिल कामडी , पोना महेश बिसने , वाहतुक पोलीस कर्मचारी अनिल यादव , आकाश खोब्रागडे , पोशि पवन भेंडारकर , गणपत सहारे सह आदि पोलीस कर्मचारी अवैध धंद्यावर कारवाई करणे कामी परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली . माहितीच्या आधारे कन्हान पोलीसांनी आंबेडकर चौक येथे नाकाबंदी केली असता एक तरुण हिरो होंडा पॅशन प्रो क्रमांक एम एच ४० एपी ३८७१ ने रेतीने भरलेल्या बोऱ्या बांधुन वाहतुक करतांना मिळुन आला . पोलीसांनी आरोपी प्रमोद रमेश केवट (वय २९) रा.रामनगर पिपरी कन्हान याला पकडुन त्याचा जवळुन दुचाकी वाहन

क्रमांक एम एच ४० एपी ३८७१ किंमत ४२०० रुपए आणि ६ प्लाॅस्टिक सिंमेटचे बोरी अंदाजे वजन १५० किलो किंमत ३५० रुपए असा एकुण ४५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . या प्रकरणी कन्हान पोलीसांनी आरोपी प्रमोद रमेश केवट याचा विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .

Youth caught transporting sand illegally on a bike

सदरची कारवाई कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात उपनिरीक्षक सुनिल कामडी , पोना महेश बिसने , वाहतुक पोलीस कर्मचारी अनिल यादव , आकाश खोब्रागडे , पोशि पवन भेंडारकर , गणपत सहारे सह आदि पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या