रिपब्लिकन सांस्कृतिक संघा द्वारे सविधान दिवस थाटात साजरा
डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधाना बद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी संविधान दिवस साजरा केला जातो - चंद्रशेखर भिमटे
कन्हान - : २६ नोव्हेंबर संविधान दिवस निमित्त रिपब्लिकन सांस्कृतिक संघाच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे संविधान दिवस व संविधान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
मंगळवार (दि.२६) नोव्हेंबर ला रिपब्लिकन सांस्कृतिक संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले . यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले . रिपब्लिकन सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांनी उपस्थितांना संविधान दिनविशेषाचे महत्व सांगितले की २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदीय विधीमंडळात स्विकारल्या गेली म्हणूनच दरवर्षी २६ नोव्हेंबर ला संविधान दिवस साजरा केला जातो . या दिनी ज्यांनी संविधान लिहिले त्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधाना बद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आजचा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो असे उपस्थितांना मार्गदर्शन करुन संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या .
या प्रसंगी मनोज गोंडाने , चेतन मेश्राम , राजेश फुलझेले , शरद मेश्राम , सुशील डोंगरे , आकाश कोटांगडे , महेश चव्हाण , दिवाळी मेश्राम , अभिजीत चांदुरकर सह आदि नागरिक उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्र संचालन आणि आभार प्रदर्शन रोहित मानवटकर यांनी केले .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या