कानपुर केमिकल मैदानात रास गरबा महोत्सवाचा थाटात शुभारंभ
जय मानवता सार्वजनिक बहुउद्देशीय संस्था कन्हान द्वारे आयोजन
रास गरबा महोत्सवाने नागरिकांत उत्साहाचे वातावरण
कन्हान : - जय मानवता सार्वजनिक बहुउद्देशीय संस्था कन्हान द्वारे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा नवरात्र महोत्सव निमित्त रास गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले .
गुरूवार दिनांक ३ आॅक्टोंबर ला घटस्थापनेच्या दिवशी कानपुर केमिकल मैदानात रात्री ८ वाजता दुर्गा मातेची संस्थेचे अध्यक्ष वर्धराज पिल्ले यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चना , आरती करुन स्थापना करण्यात आली . शुक्रवार दिनांक ४ आॅक्टोंबर ला सायंकाळी ७ वाजता संस्थेचे अध्यक्ष वर्धराज पिल्ले , कौसल्याताई गणोरकर , बालाजी नायर , रमाकांत नागपुरे , दामोधरजी बंड यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करित मातेची आरती करुन रास गरबा महोत्सवाचा थाटात शुभारंभ करण्यात आला .
या रास गरबा महोत्सवात महिलांनी , मुलींनी , मुलांनी आणि इतर स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे . नऊ दिवस रास गरबा खेळणाऱ्या उत्कृष्ट स्पर्धक तसेच सहभागी विविध पैलु च्या स्पर्धकांना मंच द्वारे बक्षीस देऊन गौरव करुन प्रोत्साहित करण्यात येणार आहे . रास गरबा महोत्सवाचा नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहुन आनंद घ्यावा असे आव्हाहन संस्थेचे अध्यक्ष वर्धराज पिल्ले यांनी केले आहे .
या कार्यक्रमात कृष्णकुमार अग्रवाल , पत्रकार चंद्रकुमार चौकसे , पी. डी. जयस्वाल , जाफर अली सय्यद , शिवसेना शहर प्रमुख , गजानन गोरले , डायनल शेंडे , दिपचंद शेंडे , छोटू राणे , शिवसेना महिला आघाडी अध्यक्षा सौ. मनिषा चिखले , सौ.नंदा घोगले , कु.तेजस्विनी शेंडे , सौ.स्नेहल राणे , सौ. माया तितरमारे आदि उपस्थित होते.
कानपुर केमिकल मैदानात रास गरबा महोत्सवाचा थाटात शुभारंभ | Ras Garba Festival in Kanpur Chemical Grounds
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या