हटकर व धनगर समाजाची काँग्रेस पक्षाच्या वतीने बैठक
मुखेड: तालुक्यातील काही अंतरावर असलेल्या मौजे कुंद्राळा़ येथे हटकर व धनगर समाजाची काँग्रेस पक्षाच्या वतीने बैठक घेण्यात आली. हा मुळात मुखेड कंधार मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असलेला समाज आहे. मागील 2019 च्या विधानसभा मध्ये काँग्रेस पक्षाकडून उमेदवार म्हणून हटकर धनगर समाजाचे नेते कैलासवासी भाऊसाहेब पाटील मंडलापूरकर यांनी मुखेड कंधार मतदार संघामध्ये विधानसभा लढवली असून थोडक्या मथाने त्यांचा मुखेड खंदार मतदार संघामध्ये पराभव झाला.
तर आता काँग्रेस पक्षाकडे काही इच्छुक उमेदवारांनी आपल्या उमेदवारीसाठी मागणीही केलेली आहे. त्यामध्ये एक माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर. मुखेड खंदार मतदार संघामध्ये छोट्या मोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद व गाठीभेटी हा उपक्रम त्यांनी चालू केलेला आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित कैलासवासी खासदार वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव. प्राध्यापक रवींद्र चव्हाण,माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, दिलीप पाटील बेटमोगरेकर,राजेंद्रजी देशपांडे, गुलाबराव नाईक, भगवानराव पाटील शिरूर दबडे, बंडू मामा, खुशाल पाटील बेटमोगरेकर, संभाजी पाटील बेटमोगरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर मुखेड खंदार मतदार संघामध्ये ते निवडून येतील का असा प्रश्न आमच्या सह संपादक यांनी जनतेस विचारले असता त्यांचे उत्तर तुम्ही पहा सविस्तर. पुढाकार 24 तास समाचार सोबत
सह संपादक: प्रशांत पवित्रे मुखेड , नांदेड
0 टिप्पण्या