Advertisement

कन्हान शहरात ईद ए मिलादुन्नबी उत्साहात , ठिकाठिकाणी मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत | Eid-e-Miladunnabi in Kanhan city with excitement, processions are welcomed with jubilation


कन्हान शहरात ईद ए मिलादुन्नबी उत्साहात , ठिकाठिकाणी  मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत

शहरासह , देशात आणि राज्यात "सुख शांति आणि एकोपा नांदो" ईद ए मिलादुन्नबी निमित्त प्रार्थना 

कन्हान : - कन्हान शहरात मुस्लिम बांधवा कडुन ईद ए मिलादुन्नबी उत्सव नमाज अदा , मिरवणुक काढुन आणि शहरासह , देशात व राज्यात सुख शांति आणि एकोपा नांदो अशी प्रार्थना करुन मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला .

सोमवार (दि.१६) सप्टेंबर रोजी ईद ए मिलादुन्नबी निमित्त मुस्लिम बांधवांनी सुन्नी मस्जिद रजा येथे इमाम , जनाब अरबाज भाई यांनी 

नमाज अदा करुन उत्सवाची सुरवात केली . त्यानंतर सुन्नी मस्जिद रजा येथून भव्य मिरवणुक काढण्यात आली . ही मिरवणुक पटेल नगर , धरम नगर , आंबेडकर चौक , तारसा चौक , सात नंबर नाका होऊन परत महामार्ग ने तारसा चौक , आंबेडकर चौक , गांधी चौक होत मिरवणुकीचे सुन्नी मस्जिद रजा येथे समापन करण्यात आले .  मिरवणुकीचे विविध सामाजिक , राजकीय संघटन द्वारे फुलाच्या वर्षाने फळ , मिठाई , खाद्य पदार्थ वितरित करुन जल्लोषात स्वागत करण्यात आले .खासदार श्यामकुमार बर्वे , आमदार आशिष जयस्वाल , नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , वर्धराज पिल्ले , विशाल बरबटे , राजेंद्र मुळक , चंद्रपाल चौकसे , सह विविध राजकीय पक्षाचा नेत्यांनी व इतर सामज बांधवानी मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादुन्नबी निमित्त शुभेच्छा दिल्या . कन्हान पोलीसांच्या चोख बंदोबस्तात ईद ए मिलादुन्नबी उत्सव शांततेत पार पडला . 

या प्रसंगी हाजी शेर मोहम्मद , अजीम भाई , गुलाब भाई , अक्रम कुरेशी , अब्दुल लतीफ भाई , फिरोज मोहम्मद , वाहीद भाई , साहिद खान , मम्पी खान , वसीम आलम , शाकीर शेख , शकील आलम , सोनू खान , सारिक शेख , अकबर सय्यद , झाकीर कुरेशी , नफीस खान , सलमान शेख , शादाब कुरेशी यांच्या सह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Eid-e-Miladunnabi in Kanhan city with excitement, processions are welcomed with jubilation

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या