Advertisement

रामटेक उपविभागीय अधिकारी (SDO) वंदना सवरंगपते यांना हिरव्या रंगाच्या नॅनो कारने कुचलण्याचा प्रयत्न

ब्रेकिंग न्युज रामटेक च्या उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना हिरव्या रंगाच्या नॅनो कारने कुचलण्याचा प्रयत्न

रामटेक: रामटेक विभागात रेत माफियाचे मजबुत नेटवर्क असुन त्यांना कोणत्याही महसुल अधिकाऱ्याचा तसेच पोलीस विभागाचा धाक राहिलेला नाही. उलट कार्यवाही करणाऱ्या अधिकाऱ्याला हिरव्या रंगाच्या नॅनो कारने कुचलण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार नुकताच रामटेक तालुक्या मध्ये आज दिनांक 14 जनवरी 2024 रोजी घडलेला आहे.

आज सकाळी पहाटेच्या वेळेस उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते या आपल्या टिमसह वाळु माफियावर कार्यवाही करण्याकामी गस्तीवर असतांना त्यांना 30 ते 40 गाड्या वाळु भरून तुमसर हद्दीमध्ये उभे असल्याची खात्रीशीर माहीती मिळाली.

ते ट्रक रामटेक हद्दी मध्ये आल्यानंतर त्या ट्रकांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील 8 ते 10 ट्रक पळून जाण्यात यशस्वी झाले. तर उर्वरित 8 ट्रकांवर कार्यवाही करून जप्त करण्यात आले.

उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी दिलेल्या माहीती नुसार त्यामधील एक ट्रक घोटीटोक भंडारा मार्गे पळुन जात असतांना आम्ही  त्याचा पाठलाग केला असता एका हिरव्या रंगांच्या नॅनो कारने आम्हाला ट्रक पकडण्यास अडथळा निर्माण केला. एका ठीकाणी आम्ही त्या कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयल केला असता त्या हिरव्या रंगाच्या नॅनो कारने वंदना सवरंगपते यांच्यावर कार चढविण्याचा प्रयल केला तसेच त्यांच्या ड्राईव्हर च्या अंगावर धावून मारण्याची धमकी दिली. तरीही 10 किलोमीटर पाठलाग केला परंतु ट्रक चालक रोडवर रेत खाली करीत अंधाधुंद ट्रक चालवून फरार झाला.

रामटेक पोलीस स्टेशनला जप्त ट्रक चालकावर गुन्हा नोंद केला असुन फरार ट्रकांचा व रेत माफियाचा शोध घेणे सुरु आहे.

प्रतिनिधी: हर्षपाल मेश्राम,रामटेक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या