Advertisement

पारशिवनी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध सावकारी चालू!अवैध सावकारी करणारे राहुल डोमकी यांना बळ कुणाचे

पारशिवनी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध सावकारी चालू!अवैध सावकारी करणारे राहुल डोमकी यांना बळ कुणाचे | A large number of illegal moneylenders are running in Parshivani talukas | Illegal Moneylender Rahul Domki |

पारशिवनी:- नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध सावकारी चालू असुन! याकडे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा सावकारांचे सहाय्यक निबंधक तालुका पारशिवनी आणि पोलिस स्टेशन यामधुन बळ कुणाचे आहे व का म्हणून आहे! अशी चर्चा पारशिवनी तालुक्या मध्ये चालू असुन हे राहुल डोमकी ज्या-ज्या व्यक्तींना व्याजाने पैसे देतात त्या व्यक्ती कडुन पैसे न मिळाल्यास त्या व्यक्ती कडे जाऊ त्यांना घाण-घाण भाषेमध्ये बोलता, त्यांना मारहाण करतात आणि त्यांच्या कडुन वाहन ( मोटारसायकल) उचलुन घेउन येतात. एवढेच नाही तर त्यांना दहा टक्के व्याजानी पैसे दिले असतील तर त्यांच्या कडुन विस टक्के व्याजानी पैसे वसुल केले जातात आणि त्यांच्या घरी भानडने ( झगडे) लावले जात असतात.

एवढेच नाहीतर यांनी दिखावा म्हणून जिम आणि फोरव्हिलर गाड्यांची सर्विसीग चे दुकान असल्याचे दाखविले असुन, शेतीचे कारणेही समोर दाखविले आहे. अशीच एक केश यांनी केले ली होती त्या केस मध्ये यांनी त्यांना पैसे देतो म्हणून बोलावले आणि त्यांना खळतकर सभागृह पारशिवनी येथुन त्यांना मारत-मारत आपल्या दुकानांमध्ये नेऊन तेथे पण त्यांना किरायाचा गुंडांच्या हाताने मारहाण करुन त्यांच्या कडुन राहुल डोमकी यांनी एक लाखाचा ( १,००,०००) एक चेक त्यांच्या हाताने भरुन घेतलेला होता. दुसरा चेक कोरा घेऊन त्यांची स्कूटी, त्यांच्या कडील पैसे घेऊन त्यांना वापस त्यांच्या गावाला पाठवले! म्हणजे ही सरासर दादागिरी नाही का?.

आज अश्याच प्रकारचा खेळ सतीश साकोरे यांच्या सोबतही खेळला जात आहे, यांनी तर संधीचा फायदा उचलुन चेक चोरुन घेऊन गेले आणि २,७५,००० रुपये ( दोन लाख पंच्यातर हजार रूपये) काढुन मोकळे झाले.

पण यांच्या कडून घेतलेली रक्कम १,०२,८००( एक लाख दोन हजार आठशे रुपये) सतीश साकोरे यांनी घेतलेली रक्कम राहुल डोमकी यांना देणे होते.  एक लाख  एकसटहजार आठशे रुपये (१,६१,८००) न घेता यांनी चेक चोरुन घेऊन गेले आणि दोन लाख पनचयआततर हजार रूपये काढुन घेतलें असे सांगितले जात्या.

धोखाधाडी करुन पैसे काढून घेतले असे माझ्या सोबत झाले असे सतीश साकोरे यांनी सांगितले,  तेव्हा हे लक्षात आले पण असे कृत्य यांनी किती तरी लोकांन सोबत केले असेल, कितीक लोकांचे घरे यांनी बरबाद केले असतील आणि किती तरी लोकांनी आत्महत्या केल्या असतील, अवैध सावकारी म्हणजे बिना परवाना सावकारी करणे गुणा नाही का असा प्रश्न विचारला जाता आहे. कधीं-कधीं मानसा कडे वेळ येत असतें म्हणून गरजेचा चुकीचा उचला, तर त्याचा चुकीचा परिणाम होतो.

तसेच पारशिवनी पोलिस स्टेशनचे ठाणेदार राहुल सोनवणे आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा सावकारांचे सहाय्यक निबंधक तालुका पारशिवनी यांनी कोणतीही विचार न करता राहुल डोमकी यांच्या वरती कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि नागपुर जिल्हा श्रमिक पत्रकार संघ यांच्या मार्फत पत्रकार परिषद घेण्यात येईल असे आवाहन सतीश साकोरे पुढाकार समाचार प्रतिनिधी पारशिवनी यांनी केलेले आहे.

दिनांक ०४/१०/२०२३ ला राहुल डोमकी यांच्या वरती कार्यवाही करण्याकरीता विषेश पोलीस महानिरीक्षक नागपूर, पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा (ग्रामीण), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गुह मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले असता, आतापर्यंत कार्यवाही करण्यात आलेली नसुन, कारवाई न झाल्यास येणाऱ्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशना मध्ये स्वतः ( सतीश साकोरे ) आमरण उपोषणाला बसणार असे लिखित देऊन मला व माझ्या कुटुंबाला काही कमी जास्त झाल्यास पारशिवनी चे थानेदार राहुल सोनवणे व राहुल डोमकी हे जबाबदार राहतील असे स्वतः सतीश साकोरे पुढाकार समाचार तालुका प्रतिनिधी पारशिवनी, यांनी नागपूर पोलीस अधीक्षक यांना लिखित पत्रक दिले आहे.

 

प्रतिनिधी:- सतीश साकोरे, पारशिवनी-नागपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या