Advertisement

गट ग्रामपंचायत बोरडा येथे युवाशक्ती पॅनल विजयी

गट ग्रामपंचायत बोरडा येथे युवाशक्ती पॅनल विजयी

रामटेक तालुक्यात २८ गट ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका ५ नोव्हेंबर ला होऊन लगेच दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर करण्यात आला.यावेळी तहसील कार्यालय परिसरात कही खुखी,कही गम असा वातावरण दिसून आले

रामटेक तालुक्यातील बोरडा (सराखा) गट ग्राम पंचायत येथे युवा-शक्ती ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय झाला.

यात सरपंच पदाकरिता उभे असलेल्या चार उमेदवारांचा पराभव करीत युवा-शक्ती ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार तुळशीदास शंकरराव राऊत यांना गावकऱ्यांनी बहुमताने निवडून दिले.

युवा-शक्ती  ग्रामविकास पॅनलमधून सदस्य पदाकरिता कु.लव  डडमल,   पंकज चौधरी    ,चेतन जांभुळे,  विष्णू घोडमारे,   सौ.इंदूबाई वाहाने,  पौर्णिमा धोटे,  कुमारी.करिश्मा मिसार  ,हे बहूमतांनी विजयी झालेत.  श्री.चंद्रभान धोटे,  सौ.ज्योती धुर्वे,  जयश्री डडमल,  कुमारी मोनिका  कोकोडे  हे  सुद्धा ग्रामपंचायत सदस्य पदाकरिता निवडुन आलेत

सर्व निवडून आलेल्या उमेदवारांची  गावात रॅली काढून स्वागत करण्यात आले.

पुढाकार 24 न्युज करीता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या