पारशीवनी तालुक्यात शालेय कबड्डी सामन्याचे थाटात उद्घाटन (जिद्द असली तरीही खेळ भावनेने खेळ खेळावा)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत! जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर द्वारा आयोजित
शालेय क्रीडा स्पर्धा 2023-24 पारशिवनी तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा हरिहर कनिष्ठ महाविद्यालय पारशिवनी येथे घेण्यात आल्या. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिहर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सूर्यकांत वानखेडे होते स्पर्धेचे उद्घाटन महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ज्ञानेश्वर खडसे यांनी केले.
त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पारशिवनी तालुका चे पोलीस निरीक्षक माननीय राहुल सोनवणे हे होते. यांनी खेळाडूंना खेळ व खेळ भावना यावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी महात्मा गांधी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख डॉक्टर सुधीर कहाते तसेच डॉक्टर राकेश कभी होते. कार्यक्रमाचे संचालन मा. काठोके सर यांनी केले प्रस्ताविक श्री अभिजीत फुलबांधे क्रीडा संयोजक पारशिवनी यांनी केले.
कार्य क्रमाचे आभार प्रदर्शन श्री रंजीत धोपरे सर यांनी केले. कबड्डी स्पर्धेसाठी पारशिवनी तालुक्यातील एकूण 40 संघांनी सहभाग घेतला.
https://www.youtube.com/watch?v=-fBpOd4roEg
14 वर्षे वयोगट मुले लालबहादूर शास्त्री शाळांनी राष्ट्रीय आदर्श विद्यालय नवेगाव खैरी, 7 गुणांनी हरवून विजयी झाला. 14 वर्षे वयोगट मुली केसरीमल पालीवाल विद्यालय पारशिवनी हरिहर शाळेला 5 गुणांनी हरवून विजयी झाला.
17 वर्षे वयोगट मुले लालबहादूर शास्त्री विद्यालय बाबुरवाडा यांनी राष्ट्रीय आदर्श विद्यालय नवेगाव खेरी या शाळेला 6 गुणांनी हरवून प्रथम क्रमांक पटकाविला. 17 वर्षे वयोगट मुली हरिहर कनिष्ठ महाविद्यालय पारशिवनी भारतीय आदर्श विद्यालय तामसवाडी या शाळेला 12 गुणांनी हरवून प्रथम क्रमांक पटकावला.
१९ वर्ष मुले व मुली दोन्ही गटात लालबहादूर शास्त्री शाळेंनी हरिहर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पारशिवनी या शाळेला सलग तीन आणि नऊ गुणांनी हरवून प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धा यशस्वी होण्यामागे माननीय केवटे सर, जावळे सर, बावनकुळे सर, काटोके सर, बांगरे सर, देशमुख सर, गजभिये सर, इटकीकर सर, साबळे सर, पाटील सर, पोकळे सर, उके सर, चिंचोलकर सर, घोडे सर, राजू बावनकुळे सर, सौ कुंदा मगर, मइंद सर, वानखेडे सर, सनी शिंदे, हर्षला घाटोडे, आकाश राऊत, वेदांत फूलबांधे, निखिल, सुहान्शी, अंकिता, रोशन, नताशा, रजत, हितेश नेवारे, दुर्गेश कांबळे, सुश्मिता शिंदे, चंद्रशेखर मेश्राम, दीपेश गौतम, सागर दुनेदार, सेजकुमार वर्मा, आयुष मसरे, इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.
एवढेच नाही तर हरिहर विद्यालय हे तालुका स्तरावर असल्यामुळे जे खेळाचे कार्यक्रम होतात ते हरिहर विद्यालयाच्या प्रांगणात घेतले जात! येथे येण्या जाण्या करिता सोपे होते त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन कबड्डी,खो खो, इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते
सतीश साकोरे प्रतिनिधी पारशिवनी-नागपूर


0 टिप्पण्या