राजेश सोमकुवर याची राहत्या घरी गळफास लावुन केली आत्महत्या
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत शिवाजी नगर येथील रहिवासी राजेश सोमकुवर यांने पायाच्या पंजाच्या जख्मेच्या त्रासाला कंटाळुन स्वत राहत्या घरी दोरीने गळफास लावुन आत्महत्या केल्याने कन्हान पोलीसांनी मेघराज लुंडुरे यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला मर्ग दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार शनिवार (दि.२९) जुलै ला दुपारी १ वाजता फिर्यादी मेघराज खेमचंद लुंडुरे वय ४९ वर्ष रा. शिवाजी नगर प्रभाग नं.७ कन्हान यांच्या घरासमोर लोकांची गर्दी दिसुन आली. तेव्हा घराचे बाहेर येऊन पाहिले असता शेजारी राहणारा राजेश एकनाथ सोमकुवर स्वत चे राहत्या घरी समोरील छपरीत दोरीने गळफास लावुन लटकलेले मृत अवस्थेत दिसुन आल्याने त्वरित पोलीस स्टेशन कन्हान ला माहीती दिली.
पोलीसांनी पोहचुन मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही करिता कामठी उपजिल्हा रूग्णालयात घेऊन गेले. राजेश सोमकुवर याला मागील २०-२२ वर्षा पासुन उजव्या पायाच्या पंजाच्या वरिल भागाला मार लागला होता. त्यानी औषधोपचार करुन त्या माराची जख्म बसत नसल्याने त्याला पायाचा भयंकर त्रास असल्याने त्या त्रासा कंटाळुन त्याने स्वत आज (दि.२९) जुलै ला सकाळी ८:00 ते १२:00 वाजे दरम्यान गळफास लावुन आत्महत्या केली असावी. राजेश हा दारु पिण्याच्या सवयीचा असुन कोणतेही काम धंदा करित नव्हता. त्याचे मृत्यु बाबत कोणावरही शक, संशय नाही. अश्या फिर्यादी मेघराज खेमचंद लुंडुरे यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी पोस्टे ला मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या