Advertisement

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उमाकांत वाडीकर यांची सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी निवड

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उमाकांत वाडीकर यांची सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी निवड

मुखेड:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट-अ परीक्षेत उमाकांत मारोती वाडीकर राज्यात NT- B प्रवर्गातून सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.

उमाकांत वाडीकर यांचे 10 वी पर्यंतचे शिक्षण जि.प.हायस्कूल काटकळंबा ता. कंधार येथे झाले. त्यानंतर 12 वी त्यांनी नरसिंह विद्या मंदिर उमरदरी. ता. मुखेड तर बी.एस्स.सी त्यांनी ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर नांदेड येथून पदवी प्राप्त केली,त्यांचबरोबर त्यांनी कायद्याचे शिक्षण लॉ.कॉलेज नांदेड येथून घेतले, त्यानंतर विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून सन 2008 मध्ये त्यांची नियुक्ती झाली, त्यांनी लोहा, कंधार, देगलूर, मुखेड, नांदेड, येथील न्यायलयात 15 वर्ष अखंड सेवा देण्याचे कार्य त्यांनी केले.

खैरकावाडी ता. मुखेड येथे जन्मलेल्या उमाकांत वाडीकर यांनी जिद्दीने हे यश प्राप्त केले आहे,

ग्रामीण भागात साधारण परिस्थितीवर मात करत आपले कर्तव्य बजावीत अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करून सकारात्मक भूमिका बजावली,या यशाचे श्रेय सद्गुरु परमपूज्य धर्मभूषण वेदाचार्य साहित्यिक वटेमोड महाराज, आई- वडील, सर्व गुरुवर्य, अॅडवोकेट दिगंबर गायकवाड अभिवक्ता संघ कंधार यांचे मा. अध्यक्ष मराठी पत्रकार संघाचे मा. कुटुंब, मित्रपरिवार बांधव व पत्नी यांना देतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी सहाय्यक संचालक सरकारी अभियोक्ता कोकाटे अनुराधा मॅडम, डॉ. रामकृष्ण बदने, साहित्यिक विठ्ठल बरसमवाड, मुख्याध्यापक जाधव सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता जोहिरे मॅडम साहेब सरकारी अभियंता संजय वाघमारे, साहेब सरकारी अभियोक्ता विजय तोटवाड, सहाय्यक सरकारी अभियोक्ता जीवन पाटील, विशेष साईड सरकारी अभियोक्ता फळेगावकर, आशिष देशपांडे, रजियोदिन, विजय बारसे, एसटी भोजने, सत्यजित जटाळ, नितीन देवसरकर, अॅडवोकेट दिगंबर गायकवाड अॅडवोकेट रणजीत भुयारे अॅडवोकेट जीवन पाटील लुंगारे, अॅडवोकेट अनिल डांगे, अॅडवोकेट नीरज कोळनुरकर अॅडवोकेट डी. एम. निलेवाड आदि यांनी मोलाचे मार्गदर्शन केले,

यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर,उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक, मा.तहसीलदार राम बोरगावकर, अॅड. बी, के, पांचाळ, अॅड. एन. डी. कोळनूरकर, अॅडवोकेट डी, जी कुटे अॅड. नागेश राठोडकर, अॅड. महेश कागणे, अॅड. अनिल डांगे, अॅड. अभय देशपांडे, अॅड. श्रेयश धर्मापुरीकरी, अॅड रवी केंद्रे, अ ॅड. दिगंबर गायकवाड, अॅड. पी. बी. कदम, गोला – गोल्लेवार संघटनेचे युवा तालुका अध्यक्ष पवनकुमार शिरबरतळ आदिनी कौतुकाचा वर्षाव करून अभिनंदन केले.

प्रतिनिधी अंकोष राठोड-मुखेड नांदेड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या