Advertisement

केरडी येथे गुरू पौर्णिमा उत्साहात थाटात साजरी

केरडी येथे गुरू पौर्णिमा उत्साहात थाटात साजरी

कन्हान-केरडी गावात जय बजरंग व्यायाम शाळा केरडी व्दारे विधिवत पुजा अर्चना करून जिवनात आई, वडीला प्रमाणेच गुरू चे अत्यंत महत्व असल्याने व्यायाम शाळेच्या खेळाडुंनी गुरू पुजा करून गुरू पौर्णिमा थाटात साजरी केली.

गुरु पौर्णिमा दिवशी सकाळी जय बजरंग व्यायाम शाळा केरडी येथे व्यायाम मंडळाचे अध्यक्ष मा. दयारामजी भोयर यांच्या अध्यक्षेत मा.पांडूरंगजी काठोके यांचे हस्ते व्यायाम शाळा व श्री हनुमान मंदीरात विधिवत पुजा अर्चना करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

यावेळी मान्यवरांनी मनुष्य जिवनात आई, वडीला प्रमाणेच गुरू चे अत्यंत महत्व असल्याचे संबोधुन सर्वानी सत्याच्या मार्गाने चालल्यास चांगले यश प्राप्त करता येते असे मौलिक मार्गदर्शन केले. व्यायाम शाळेतील खेळाडुंनी आपल्या अखाड याच्या गुरूला नमन व पुजा करून आशिर्वाद घेतला.

या प्रसंगी कार्यक्रमात देवाजी भोयर, प्रविण शेलारे, गणपत ठाकरे, रामभाऊ हिवसे, राजु वानखेडे, शंकर फलके, समिर, यश शेंडे, अमित खंडार, वसंता भोंगाडे, किसना हिवसे, विलास ठाकरे, रवि, वैभव भोयर, हितेश भोयर सह मान्यवर नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या