Advertisement

संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा हर्षउल्हासात संपन्न

संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा हर्षउल्हासात संपन्न

सुरगाणा/नाशिक :- शिंपी समाजाच्यावतीने संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७३ व्या संजीवनी समाधी सोहळा सुरगाणा शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सत्यनारायण पूजा, कीर्तन, भूमिपुजन, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

श्री स्वामी समर्थ महाराज मठात श्री. नंदकिशोर रामदास भांबेरे यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. त्यानंतर ह.भ प. जयंत महाराज सालभोये यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते व ह.भ. प. कीर्तनकार, वादक, भजनी मंडळी यांचा सत्कार समाजाच्या वतीने करण्यात आला. तसेच समाज कार्यालयासाठी नियोजित असलेल्या जागेचे भूमिपूजन समाजाचे ज्येष्ठ नागरिक रामदासशेठ महाले यांच्या हस्ते करण्यात आले व प्रत्येक समाज बांधवांच्या हातून श्रीफळ फोडून व जमिनीला टिकाव मारण्यात आला.

संत नामदेव महाराज यांचे मंदिर तसेच जागेच्या बाजूने वॉल कम्पौंट लवकरच सुरुवात करणार असे, अध्यक्षांच्या वतीने सांगण्यात आले. यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमासाठी समाजाचे अध्यक्ष सचिन महाले, उपाध्यक्ष राकेश खैरनार, सचिव तसेच महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य किशोर जाधव, व इतर पदाधिकारी सदस्य मनोज महाले, नितीन विसावे, भोलानाथ बिरारी, घनश्याम पवार, दिनेश पवार, भूषण बिरारी, धिरज संधानशिव, योगेश महाले, सचिन खैरनार, योगेश भांबेरे, दीपक संधानशिव तसेच जेष्ठ नागरिक, महिला वर्ग, बालगोपाल उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थित कार्यक्रमाची शोभा वाढून संजीवन समाधी सोहळा सुंदर रीतीने हर्षउल्हासात संपन्न झाला.

प्रतिनिधी-किशोर जाधव, सुरगाणा/नाशिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या