राजमाता जिजाऊ यांना सार्वजनिक वाचनालय कन्हान व्दारे अभिवादन
कन्हान – राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्य सार्वजनिक वाचणालय हनुमान नगर कन्हान व्दारे पुण्यतिथी कार्यक्रम करून राजमाता जिजाऊ ला अभिवादन करण्यात आले.
शनिवार (दि.१७) जुन ला सायंकाळी ७ वाजता सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम जेष्ट नागरिक श्री देवरावजी कावळे यांचे अध्यक्षेत व सामाजिक कार्यकर्ते गंगाधरजी अवचट यांच्या प्रमुख उपस्थित राजमाता जिजाऊ च्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सभासद, सदस्य हयानी पुष्प अर्पण केल्यावर सर्वानी उभे राहुन दोन मिनिटे मौनधारण करून श्रध्दाजंली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात अभिषेक निमजे, राहुल पारधी, प्रमुख अतिथी व अध्यक्ष हयानी राजमाता जिजाऊ यांच्या कार्या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रंथपाल श्याम बारई यांनी तर आभार लिपिक कृणाल कोल्हे यांनी केले.
या प्रसंगी सचिव मनोहरराव कोल्हे, राहुल बेलेकर, अल्काताई कोल्हे, कु.सिमा देवढगळे सह वाचनालयाचे सभासद, सदस्य व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या