Advertisement

कन्हान येथे बकरी ईद उत्साहात साजरी

कन्हान येथे बकरी ईद उत्साहात साजरी

कन्हान-कन्हान पटेल नगर सुन्नी रज्जाक मस्जिद येथे बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली

मुस्लीम समाजात बकरी ईद हे मोठे सण म्हणून साजरे केले जातात. या दिवशी बकरा कुर्बान करून प्रत्येक आपल्या नातेवाईकाला आणि काही गरीब लोकांना त्याच्या मटन वाटप करीत असतात. गुरुवार दिनांक २९ जुन ला बकरी ईद निमित्य कन्हान पटेल नगर येथील सुन्नी रज्जाक मस्जिद येथे सकाळी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले.

यावेळी राष्ट्रीय एकात्मता, जातीय सलोखा, शांतता नांदावी या साठी विशेष दुआ मागण्यात आली. त्यानंतर सर्वांनी एकमेकांना गळा भेट करुन ईद च्या शुभेच्छा दिल्या। त्यानंतर मित्रासह आणि कुटुंबासह ईद मोठ्या उत्साहात थाटात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी इमाम हिदायत रजा, शेख अकरम कुरेशी, अब्दुल लतीफ़ शेख़,मोह शफीक शेख, फिरोज मोहम्मद,फैयाज खान, शेख ज़ाकिर हुसैन, शाहनवाज़ शेख़, शादाब कुरेशी, नफीस खान, सोहैल ख़ान, इसराइल ख़ान, अनीश खान पठान, शाहिद खान, गौश मोहम्मद, आकिब सिद्धिकी, अल्फ़ाज़ शेख, अनस शेख, अर्शीद शेख, साहिल खान सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या