१५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देऊन लैंगिक अत्याचार
कन्हान पोस्टे ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
कन्हान – परिसरातील नाका नंबर सात, कांद्री येथे राहणारा आरोपी रुपेश पुरे याने १५ वर्षीय अल्पवयीन मुली सोबत मैत्री करुन लग्नाचे अमिष देऊन जबरदस्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने पोलीसांनी अल्पवयीन मुलीच्या तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
पोलिसां कडुन प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ही शाळेत शिकत असतांना मागील वर्षी दहाव्या महिन्या पासुन रुपेश पुरे रा.सात नं.नाका, कांद्री हा नेहमी शाळे समोर येऊन बसत होता. शाळा सुटल्यानंतर मुली सोबत बोलत होता.मुलगी मुलांसोबत दररोज बोलत असल्याने मुलीची त्याचे सोबत मैत्री झाली.
नंतर रुपेश याने घरातील लोक हे बाहेर कामावर गेल्यानंतर घरी कोणी हजर नसल्याची संधी साधुन दोन ते तीन वेळा मुलीला आपल्या मोटार सायकलवर बसवुन आपल्या राहत्या घरी घेऊन जाऊन अल्पवयीन मुली सोबत जबरीने संबंध करत होता. (दि.१२) नोव्हेंबर २०२२ ला सायंकाळी अंदाजे ५ वाजता दरम्यान रुपेश पुरे हा मुलीला भेटला व त्याने मुलीला आपण सोबत माझे घरी राहु व नंतर लग्न करू असे म्हटल्यावर मुलीने त्याला सांगितले की आपण एका समाजाचा नसल्याने, आपण लग्न कसे करू शकतो यावरून रुपेश पुरे याने मुलीची समजूत काढली.
(दि.११) नोव्हेंबर २०२२ ला सायंकाळी मुलीच्या घरी आई व वडिलांचा झगडा झाला होता. त्यावेळी मुलीच्या वडिलांनी रागाचे भरात मुलीच्या आई ला तु इथे राहायचे नाही, येथुन निघुन जा असे म्हटले होते. मुलीचे वडील हे नेहमी दारू पियु न घरी येऊन शिव्यागाळी करत होते. म्हणुन मुलगी त्याच वेळी रागाचे भरात रुपेश सोबत त्याचे घरी निघून गेली. (दि.१४) जुन २०२३ पर्यंत रुपेश च्या घरी अंदाजे ८ महिने राहली.
या दरम्यान मुलीची आई बरेच वेळा मुलीला घरी नेण्यासाठी रुपेश च्या घरी आली परंतु रुपेश ने मुलीला तिच्या आई सोबत भेटु दिले नाही व आई परत घरी चालली गेली.मुलगी रुपेश सोबत त्याचे घरी राहत असल्याने त्याने ८ ते १० वेळा मुली सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्तापित केले. रुपेश हा पण दारू पिऊन मुलीला नेहमी संबंध करायला बोलत होता व मुलीने त्याला लग्न करायला म्हटले की, नंतर करू म्हणून वेळ मारुन नेत होता.मुलीला सारखा शारीरिक मानसिक त्रास देत होता.
त्याचा त्रासाला कंटाळुन (दि.१४) जुन रोजी आपल्या आईच्या घरी आल्याने सायंकाळी ५ वाजता दरम्यान रुपेश पुरे मुलीच्या आई चे घरी आला व त्याने मुलीला पकडुन डोक्यावर स्टील चे गुंडा ने मारले आणि मुलीची आई मधात आली तर त्याने आई ला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला. पोलीस स्टेशन ला तक्रार दिली तर मी पुन्हा मारिन असे म्हटले असता मुलगी व तिची आई घाबरल्याने त्याचे विरोधात तक्रार द्यायला गेले नसल्याने सायंकाळी ८ वाजता दरम्यान मुलीचे वडील, आई व मुलगी आपल्या घरी हजर असतांना रूपेशने मारण्याची धमकी व शिव्या दिल्या.
सदर प्रकरणी कन्हान पोलीसांनी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोस्टे ला आरोपी रुपेश पुरे विरुद्ध अप.क्र ३६८२३ कलम ३७६ (२) (एन), ३७६ (३), ३२४, ५०४, ५०६ भादंवि सहकलम ४, ६ पोक्सो सह कलम ३ (१) (आर)(एस)(डब्लु) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित असुन आरोपीचा शोध घेत आहे.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या