श्री सुभाष शुगर कारखान्याचे चेअरमन सुभाष लालासाहेब देशमुख यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटने द्वारे 75फळवृक्ष लागवड करून वाढदिवस साजरा
हादगाव / नांदेड :- श्री सुभाष शुगर कारखान्याचे चेअरमन सुभाष लालासाहेब देशमुख यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून 75 फळवृक्ष लागवड करून साजरा करण्यात आला.
श्री सुभाष शुगर कारखान्याचे चेअरमन सुभाषराव लाला साहेब देशमुख यांच्या 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवस स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून साजरा करण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसनीकर व कारखाना पदाधिकारी यांच्याकडून 75फळवृक्षाची लागवड दिनांक 26 जनवरी सुभाष शुगर येथे करण्यात आली.
यावेळी या कार्यक्रमास स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष, कारखान्याचे जनरल मॅनेजर राजेश मानधना, शेतकी अधिकारी पतंगे , वानखेडे, गीते, सचिन पवार आणि पत्रकार राहुल बहादुरे, पतंगे, सुखापुरे आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी- तुकाराम चव्हाण, हादगाव
0 टिप्पण्या