Advertisement

पंचशील बुद्ध बिहार येथे दोन दिवसीय विविध कार्यक्रमाने बौद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

पंचशील बुद्ध बिहार येथे दोन दिवसीय विविध कार्यक्रमाने बौद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

कन्हान – कन्हान शहरातील पंचशील बौद्ध बिहार सत्रापुर येथे दोन दिवसीय विविध कार्यक्रमाने बौद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात थाटात साजरी करण्यात आली.

शुक्रवार दिनांक ५ मई बौद्ध पौर्णिमा दिनी पंचशील बुद्ध बिहार सत्रापुर येथे अभिवादन व बुद्ध वंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित वरिष्ठ नागरिक जयवंता गटपाडे, सामाजिक कार्यकर्ते उमेश पौनिकर, समीर मेश्राम यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बौद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण आणि दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांनी गौतम बुद्ध यांचा जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बुद्ध बिहार येथे बुद्ध वंदना करण्यात आली.

दुसऱ्या दिवशी शनिवार दिनांक ६ मई ला पंचशील बुद्ध बिहार सत्रापुर येथे स्नेह भोजन कार्यक्रम करुन दोन दिवसीय कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या प्रसंगी अंशुल गजभिए, रितीक कापसे, राजेंद्र पौनिकर, आदित्य जांभुळकर, मयुर चव्हान, गोल्डी वाघमारे, श्रीकांत वाघमारे, आशिष पात्रे, पियुष गजघाटे, विजय वाघमारे, रोशन देशभ्रतार, मनोहर मेश्राम, निरज सुपामे, सक्षम रंगारी, सह आदि नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या