Advertisement

पारशिवनी मधील पशु वैद्यकीय दवाखाना सुविधा पासून ग्रामस्थ वंचित

पारशिवनी मधील पशु वैद्यकीय दवाखाना सुविधा पासून ग्रामस्थ वंचित

पारशिवनी:- नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथिल पशु वैद्यकीय दवाखान्यातील अधीकारी आणि कर्मचारी यांच्या भोंगळ कारभार उघडकीस आल्याची घटना समोर आली आहे.  पारशिवनी पंचायत समितीचे खंड विकास अधीकारी सुभाष जाधव यांना पुढाकार समाचार प्रतिनिधी, यांनी फोन केला असता त्यांनी उचलला नाही व संबंधित पशु  दवाखान्याचे प्रश्न सुटले नाही.

खंड विकास अधीकारी, तालुका पशु वैद्यकीय अधिकारी ठाकुर, यांचे पशु  दवाखान्यावर बरोबर नियंत्रण नसल्याने मनमानी कारभार असल्याचे लक्षात येते. पारशिवनी येथील पशु वैद्यकीय कर्मचारी सकाळी आपल्या खाजगी जनावरे बघण्याकरित निघून जातात व सरकारी पशु दवाखान्यासमोर गरीब नागरिक, गरीब शेतकरी, आपले आजारी जनावरे दवाखान्यात घेऊन येतात पण पशु वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात वेळेवर उपस्थित नसल्यानी ग्रामस्थांचा संताप होतो. असा हा प्रकास उघडकीस असल्यामुळे चित्र समोर आले कि पशु वैद्यकीय अधिकारीचे दवाखान्या कडे दुर्लक्ष केले जाते. प्रशाकीय अधिकारी यांना प्रशासन पगार देतो कि नाही क? असा प्रश्न उपस्थित होतो.

तालुका पशु वैद्यकीय अधिकारी ठाकुर हे नेहमी कार्याल यांमध्ये उशिरा उपस्थीत राहत असतात. एवढेच नाहीतर दवाखाना मध्ये येणारे हे करभाळ गाव येथिल असुन पारशिवनीचे पण लोक आपले जनावरे घेउन दवाखान्यांमध्ये येत असतात. बेजबाबदार तालुका पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या बाबद आदिवासी क्षेत्रातील गरीब जनता पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यांनी असंतृष्ठ आहे हे निदर्शनात येत आहे. पारशिवनी मध्ये जवळपास १३६ छोटे-मोठे गाव येत असतात. वेळेवर पशु वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसतो. सकाळी आपली नगदी कमाई करण्या करिता निघालेले पशु वैद्यकीय अधिकारी दोन ते तीन तास पशु दवाखान्यात येतात.

आदिवासी दुर्गम भागात मोठ्या संखेत गुरे-जनावरे आहे व पारशिवनी तालुक्यात आदिवासी बहुल क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यानी गरीब जन्तेकले कश्या प्रकारे पशु वैद्यकीय दुर्लक्ष करता हे आपण बघू शकता. तरी सुध्धा अध्यापही वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांच्यावर आता पर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. जिल्हा परिषद अधिकारी यांनी ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी पारशिवनी ग्रामस्थांनी केली आहे.

प्रतिनिधी:- सतीश साकोरे पारशिवनी-नागपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या